बॉलिवूड कारकिर्दीसाठी चुलत बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा सदैव सहाय्य करण्यासाठी तयार असल्याचे सांगत अभिनेत्री मीरा चोप्राने प्रियांका आणि ती भावनिकदृष्ट्या एकमेकीच्या अतिशय जवळ असल्याचे म्हटले. परिणीतीपेक्षा आपण प्रियांकाच्या अधिक जवळ असल्याचा खुलासादेखील मीराने केला. दक्षिण भारतीय चित्रपटांमधून काम केल्यानंतर जेव्हापासून मीराला बॉलिवूडमधील चित्रपटात काम करायचे होते, तेव्हापासून प्रियांका आणि परिणीती या तिच्या बहिणींबरोबर तिचे द्वेषपूर्ण संबंध असल्याच्या बातम्या कानावर पडत होत्या. मीरा कुटुंबाचा भाग नसून, दूरची नातेवाईक असल्याचे देखील परिणितीने म्हटले होते. परिणितीचे हे विधान अनुचित आणि मुर्खपणाचे असल्याचे मीराचे म्हणणे आहे. याविषयी बोलताना मीरा म्हणाली, २० वर्षापूर्वी आम्ही सर्वजण एकत्र वाढलो. आम्ही एकत्र राहात होतो. विभक्त होऊन वेगवेगळ्या शहरात स्थायिक हेण्याआधी सर्व भाऊ एकमेकाच्या खूप जवळ होते. परिणिती लहान आहे, प्रियांका आणि मी एकाच वयाच्या आहोत… आम्ही एकमेकींच्या खूप जवळ आहोत. परिणितीच्या विधानाचा समाचार घेत मीरा पुढे म्हणाली, परिणितीने असे विधान करणे हे मुर्खपणाचे लक्षण आहे. तुम्ही असं कसं बोलू शकता. तिच्याशी माझे काहीही भावनिक संबंध नसल्याने तिच्या अशा विधानाचा माझ्यावर परिणाम होत नाही. तिच्याबरोबर घालविलेले क्षणदेखील माझ्या लक्षात नाहीत.
मीरा आणि प्रियांका एकमेकींच्या जवळ असल्याने असे एखादे विधान प्रियांकाकडून आले असते तर मीरावर त्याचा नक्कीच परिणाम झाला असता.

Story img Loader