बॉलीवूडची २०१३ मधील सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री कोण, असे विचारले तर ‘दीपिका’ हे उत्तर निर्विवादपणे येईल. तर स्टाईल, अभिनय आणि पडद्यावरचा सहज वावर प्रत्येक भूमिकेतून दाखविणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा हेही उत्तर सहजपणे देता येईल. या दोघींविषयी तुम्हाआम्हाला बरीच काही माहिती असली, तरीही या दोघींना मात्र अन्य जगाची सोडा, खुद्द बॉलीवूडचीही जुजबी माहिती नसल्याचे अलीकडेच उघड झाले.
 उदाहरणार्थ, बॉलीवूडचा एकमेव मेगास्टार कोण, असे विचारले तर कुणीही लगेचच बिग बी असे म्हणेल. ‘ड्रीमगर्ल’ कोण असे विचारले तर लगेचच हेमा मालिनी हे उत्तर मिळेल.परंतु, दीपिका आणि प्रियांका या नियमाला अपवाद ठरल्या आहेत. ‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या कार्यक्रमात गप्पा करताना करणने सहज विचारले, तुम्ही दोघी संगीतकार आर. डी. बर्मन यांचे एक तुम्हाला आवडणारे गाणे म्हणा. तर त्यावर दीपिका व प्रियांका यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. या दोघींनाही पंचमदांचं एकही गाणं गुणगुणता आलं नाहीच; परंतु, हे आर.डी. बर्मन कोण असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. आपण ज्या व्यवसायात आहोत तिथे आपल्या पूर्वसुरींनी काय कामगिरी केली याची उत्सुकता सोडाच; परंतु छोटय़ा पडद्यावर बॉलीवूडविषयक माहितीबाबत इतकी कमालीची अनभिज्ञता दाखविणाऱ्या अभिनेत्रींना काय म्हणायचे?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka and deepika shocking expression in koffee with karan