बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले. त्यांनी सोशल मीडियावर याबाबतची गुडन्यूज चाहत्यांना दिली. बाळाची गुडन्यूज दिल्यानंतर सर्वत्र त्याबाबत चर्चा सुरु आहे. प्रियांका चोप्राच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या प्रियांका ही तिच्या सहा महिन्याच्या मुलीला घेऊन पिकनिक एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा तिने एक खास फोटो शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका चोप्रा ही मुलीसोबत छान एन्जॉय करताना दिसत आहेत. नुकतंच प्रियांकाने त्यांच्या पिकनिकचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी प्रियांकाही तिच्या सहा महिन्याची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनससोबत फिरण्यासाठी गेली आहे. मालतीची ही पहिली पिकनिक आहे. प्रियांकाने इन्स्टाग्रामवर तिच्या मुलीची एक झलक दाखवली आहे. यात प्रियांका तिच्या मुलीला कुशीत घेऊन बसल्याचे दिसत आहे. तिच्यासोबत तिची एक मैत्रिणही पाहायला मिळत आहे.

“हा माझा…”, आई-बाबा झाल्यानंतर तब्बल महिनाभराने प्रियांका आणि निकचे एकत्र ‘लाँग ड्राईव्ह’

या फोटोला कॅप्शन देताना प्रियांका म्हणाली, “२२ वर्षांचा प्रवास अजूनही सुरु आहे… आता आम्ही आमच्या मुलांसोबत आहोत.” प्रियांकाने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या मुलीचा चेहरा लपवला आहे. तिने या फोटोवर तिच्या मुलीच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजी केला आहे. प्रियांका चोप्राची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रियांकाने २०१८ मध्ये निक जोनासशी लग्न केले. त्यांनी जयपूरमध्ये लग्न केले. तर त्याच वर्षी मे महिन्यात ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले होते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या मदतीने मुलीला जन्म दिला. प्रियांका आणि निकच्या मुलीचं नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ असे ठेवण्यात आलं आहे. नुकतंच तिने तिच्या पोस्टमध्ये याला दुजोरा दिला आहे.

आई मधू चोप्राच्या वाढदिवसानिमित्त प्रियांका चोप्राची खास पोस्ट, म्हणाली…

प्रियांकानं आपल्या मुलीचं नाव ठेवताना दोन्ही संस्कृतींचा विचार केल्याचं बोललं जात आहे. मालती हे नाव संस्कृतमधून घेण्यात आलं आहे. ज्याचा अर्थ आहे ‘लहान सुगंधित फुल’ तर मेरी हे नाव लॅटिन भाषेतील स्टेला मॅरीसमधून घेण्यात आलं आहे. ज्याचा अर्थ समुद्राचा तारा असा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra and baby malti marie hang out with her friend of 22 years photos viral nrp