प्रियांका चोप्रा निक जोनासची तिसरी आलिशान रिसेप्शन पार्टी नुकतीच मुंबईत पार पडली. या पार्टीसाठी बॉलिवूडमधल्या तारे- तारकांची मांदियाळी पाहायला मिळाली, अगदी सलमान कतरिनापासून ते सायना नेहवालपर्यंत बॉलिवूड स्टार या पार्टीसाठी उपस्थित होते.
या पार्टीत बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध गाण्यांवर परिणीतीसह रणवीर दीपिकानंही ठेका धरला. पार्टीत डान्सफ्लोअरवर नाचण्याचा मनसोक्त आनंद लुटणाऱ्या पाहुण्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी अनोखी शक्कल प्रियांका निकनं लढवली होती. डान्स फ्लोअरवर नाचणाऱ्या पाहुण्यासाठी त्यांनी चक्क चप्पला ठेवल्या होत्या. उंच टाचांच्या चपला घालून नाचताना सेलिब्रिटींना कोणताही त्रास होऊ नये यासाठी फ्लिप फ्लोप चप्पलांची सोय प्रियांकानं केली होती. तिची ही कल्पना सगळ्यांनाच विशेष आवडली. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यात पार्टीत प्रियांकानं दीपिकासोबतही डान्स करत बाजीराव मस्तानी चित्रपटाचं यशही साजरं केलं. या दोघींची प्रमुख भूमिका असलेला बाजीराव- मस्तानी २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या चित्रपटाची तीन वर्ष पार्टीत साजरी करत दीपिका प्रियांकानं पिंगा गाण्यावर ठेकाही धरला. डिसेंबरच्या सुरूवातीला विवाहबंधनात अडकलेल्या या दोघांनी १९ आणि २० डिसेंबर रोजी मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवलं होतं. कंगना, कतरिना, अनुष्का, रेखा, सलमान, रणवीर , संजय दत्त अशी अनेक बॉलिवूड मंडळी या पार्टीसाठी आली होती.