बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली प्रियांका चोप्रा आता ग्लोबल स्टार झाली आहे. १८ जुलैला प्रियांकाने ४० वा वाढदिवस साजरा केला आणि आपल्या पत्नीचा वाढदिवस खास असावा यासाठी निक जोनसने पूर्ण प्रयत्न केले हे त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंमध्ये दिसून येत आहे. निक आणि प्रियांकाने त्यांच्या इन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या काही झलक शेअर केल्या आहेत. या फोटोंमध्ये निक- प्रियांकाचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या निक आणि प्रियांकाच्या फोटोंचीच चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निक जोनसने प्रियांकाचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे खास आणि हटके अंदाजात साजरा केला. याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस समुद्र किनाऱ्यावर एकमेकांना लिपलॉक करताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये दोघांचीही सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. प्रियांका- निकचे हे रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. दोघांच्याही नजरेत एकमेकांवरील प्रेम दिसून येत आहे.

आणखी वाचा- सहा महिन्याच्या लेकीला घेऊन प्रियांका चोप्रा निघाली पिकनिकसाठी, म्हणाली “आता आमच्या मुलांसोबत…”

याशिवाय प्रियांका चोप्राच्या बर्थ डे सेलिब्रेशचे काही हटके फोटो देखील निकने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील एका फोटोमधील कार्डवर ‘हॅप्पी बर्थ डे प्रियांका चोप्रा, ८०च्या दशकातील बाळ’ असं लिहिलेलं आहे. सोशल मीडियावरील या फोटोंमधून प्रियांका आणि निकने यंदाचा वाढदिवस खूपच उत्साहात साजरा केल्याचं दिसून येत आहे. तसेच निक जोनसने सोशल मीडियावर प्रियांकाचे काही फोटो शेअर करत तिला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

निक जोनसने त्याच्या इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. यातील एका फोटोमध्ये त्याने हातात एक टॉवेल पकडलेला दिसत आहे. ज्यावर लिहिलंय, ‘Priyanka! the jewel of july est. 1982’ हे फोटो शेअर करताना निकने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘जुलैमधील माझ्या रत्नाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्यासोबत आयुष्याचा क्रेझी प्रवास करत असल्याचा अभिमान वाटतो. खूप प्रेम प्रियांका चोप्रा.’ दरम्यान निक आणि प्रियांकाचे हे फोटो खूप व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra and nick jonas lip lock on beach photo goes viral mrj