बॉलिवूडची देसी गर्ल आणि ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा काही महिन्यांपूर्वीच आई झाली आहे. प्रियांकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिल्याची माहिती दिली होती. त्यानंतर निक जोनस आणि प्रियांका नेहमीच इन्स्टाग्रामवर मुलीचे फोटो शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी मुलगी मालती मेरी ६ महिन्यांची झाल्यानंतर तिचा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. आता प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा आई होणार असल्याच्या चर्चा आहेत.

प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी मालती मेरी ६ महिन्यांची झाल्याच्या निमित्ताने धम्माल सेलिब्रेशन केलं. पण आता ती दुसऱ्या बाळाचा विचार करत असल्याचं बोललं जात आहे. प्रियांका आणि निकच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका आणि निक मालतीसाठी भाऊ किंवा बहिणीचा विचार करत आहेत. आपल्या लेकीला भावंडांची कमतरता भासू नये असं या दोघांना वाटतं त्यामुळे निक- प्रियांका दुसऱ्या सरोगसीचा विचार करत असल्याचंही बोललं जात आहे. मात्र हे कधी होणार याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

आणखी वाचा- लेकीला कडेवर घेत प्रियांका चोप्राने केले वाढदिवसाचे सेलिब्रेशन, फोटो व्हायरल

सूत्रांच्या माहितीनुसार, आपल्या मुलांच्या वयात फार अंतर असू नये असं निक जोनसला वाटतं. त्याची मुलं देखील त्याच्या भावंडांप्रमाणे असावीत असं निकचं मत आहे. एवढंच नाही तर या दोघांच्या आई- वडिलांना यात कोणतीही समस्या नाही. निक आणि प्रियांकानं वेळेतच त्यांची फॅमिली प्लान करावी असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे निक- प्रियांका दुसऱ्या बाळाचा विचार करत आहेत. दोघंही त्यांच्या कुटुंबाच्या आनंदाचा विचार करत आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रानं ४० वा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे बरेच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रियांकाचा तिच्या लाडक्या लेकीसोबत हा पहिलाच वाढदिवस होता. प्रियांकाने शेअर केलेले फोटो बरेच व्हायरल देखील झाले होते. मात्र अद्याप प्रियांकाने मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. त्यामुळे मालती कशी दिसते हे पाहण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

Story img Loader