सध्या सोशल मीडियावर बॉडी स्प्रेच्या जाहिरातीचा मुद्दा जोरदार चर्चेत आहे. लेयर शॉट या बॉडी स्प्रे ब्रँडची जाहिरात लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देत असल्याचं म्हणत अनेक सेलिब्रेटींनी या जाहिरातीवर टीका केली आहे. तसेच ही जाहिरात प्रसिद्धि माध्यमांवरून हटवण्याची मागणी केली आहे. या जाहिरातीवर अभिनेत्री प्रियांका चोप्रानं देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियांका चोप्रानं या बॉडी स्प्रे जाहिरातीवर आक्षेप घेत एक ट्वीट केलं आहे. तिने लिहिलं, “हे फारच लाजिरवाणं आणि घृणास्पद आहे. या जाहिरातीला हिरवा कंदिल मिळावा म्हणून किती पातळ्यांवर मंजुरी देण्यात आली आणि किती लोकांना हे सर्व योग्य वाटत आहे? मला आनंद वाटतो की मंत्रालयाने यावर योग्य वेळी कारवाई करत ही जाहिरात हटवली आहे.”
प्रियांका चोप्रा व्यतिरिक्त अभिनेता फरहान अख्तरनं देखील या जाहिरातीला विरोध करत एक ट्वीट केलं आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, “सामूहिक बलात्कार आणि महिलांचे लैंगिक शोषण अशा गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती मंजूर कशा होतात. हे खूपच लजास्पद आहे. यावर विचार करणे गरजेचे आहे.” याशिवाय अभिनेत्री ऋचा चड्ढा, सोना मोहपात्रा यांनी देखील या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे.
सोशल मीडियावरील प्रतिक्रियांनंतर जाहिरात हटवण्याचे आदेश
या जाहिराती प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर यावरून प्रचंड संताप व्यक्त केला गेला. सर्वांनीच यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. बॉडी स्प्रे ब्रँड लेयर शॉटशी संबंधित दोन जाहिरातींवरून वाद झाल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही त्यावर आक्षेप घेतला. आता केंद्र सरकारने यूट्यूब आणि ट्विटर या दोन्ही जाहिरातींवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे जाहिरात?
संबंधित जाहिरातीत एक मुलगी मॉलमध्ये शॉपिंग करत असताना काही तरुण तिथे येतात आणि म्हणतात, आम्ही चौघं आणि ही फक्त एक तर मग शॉट कोण घेणार. खरं तर ते बॉडी स्प्रेच्या बॉटलबद्दल बोलत असतात मात्र त्यामुळे ती मुलगी घाबरते. त्या तरुणांचं बोलणं ज्या अर्थानं दाखवण्यात आलं आहे त्यावर सर्वांना आक्षेप घेतला आहे. या जाहिरातीतील दृश्य ही लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणारी आहेत असं म्हणत या जाहिरातीला जोरदार विरोध केला जात आहे.