पाकिस्तानातील पेशावर येथील लष्कराच्या शाळेवर तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्याचा बॉलीवूडकरांनी तीव्र निषेध व्यक्त केला. शाळेतील चिमुरड्यांवर केलेला हल्ला हा थक्क करणारा असल्याच्या प्रतिक्रिया जगभरातून व्यक्त होत आहेत. पाकिस्तानी अभिनेता अली जाफरने देखील दु:ख व्यक्त केले तर, अभिनेता अर्जुन कपूरने शालेय चिमुकल्यांवरील हल्ल्याची माहिती समजताच मन पूर्णपणे कोसळून गेल्याची भावना व्यक्त केली. आजचा दिवस अतिशय वाईट असून तेथे अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या सुखरुपतेसाठी प्रार्थना करत असल्याचेही अर्जुनने म्हटले आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राने निरपराध चिमुकल्यांवर हल्ला करणे हा दहशतवाद्यांचा दुबळेपणा असून धक्कादायक प्रकार असल्याचे ट्विट केले आहे. तर, फरहान अख्तरनेही हल्ल्याचा निषेध केला आहे.

Story img Loader