आतापर्यंत कोणत्याच भारतीय अभिनेत्रीले जे जमू शकले नाही ते प्रियांका चोप्राने साध्य करून दाखविले आहे. आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रॅण्ड ‘गेस’ च्या २०१३ कॅम्पेनसाठी प्रियांका काम करत आहे. या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसाठी काम करणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.
फोटो गॅलरीः ‘गेस’गर्ल प्रियांका
‘गेस’साठी करण्यात आलेल्या फोटोशूटमध्ये प्रियांकाने मादक कपडे परिधान केले होते. डोळ्यांना जाडसर आयलायनर लावलेले आणि गेसची सिग्नेचर हेअरस्टाईल तिने यावेळी केली होती. हे फोटोशूट प्रसिद्ध गायक-छायाचित्रकार ब्रायन एडम्स याने केले. मला ‘गेस’गर्ल झाल्याचा अभिमान वाटत आहे. ‘गेस’साठी इतके छान फोटोशूट केल्याबद्दल मी ब्रायनचे आभारी आहे, असे प्रियांकाने ट्विट केले आहे. तसेच ब्रायननेही प्रियांकाचा फोटो ट्विट केला आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांकाची निवड ‘गेस’चे अध्यक्ष पॉल मर्सिआनो यांनी केल्याचे कळते. सध्या, प्रियांका याच्याच कॅम्पेनसाठी न्यूयॉर्कला गेली आहे. बॉलीवूड दीवा प्रियांका चोप्रा सर्वत्र तिची छाप सोडत आहे. (छाया सौजन्यः प्रियांका चोप्रा ट्विट)

Story img Loader