बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटात प्रियांका पेशव्यांची सम्राज्ञी काशीबाईंची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी मराठी भाषेतील बारकावे समजून घेण्याची गरज असल्याने सध्या प्रियांका चोप्रा मराठीचा जोरदार अभ्यास करत आहे . प्रियांकाने ‘बाजीराव-मस्तानी’च्या चित्रीकरणाला सुरूवात होण्यापूर्वीच मराठीची शिकवणी लावली होती. मात्र, प्रत्यक्ष चित्रीकरणावेळी चुका टाळण्यासाठी सध्या प्रियांकाच्या शिक्षकांकडून तिच्या मराठी उच्चारांवर मेहनत घेतली जात आहे. सध्या प्रियांकाचे वेळापत्रक प्रचंड व्यग्र असल्याने तिला मराठी शिकण्यासाठी तितकास वेळ मिळत नाही. त्यामुळे बाजीराव- मस्तानीच्या प्रत्येक चित्रीकरणाला आणि डबिंगला तिच्या मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांना उपस्थित राहू देण्याची परवानगी प्रियांकाने दिग्दर्शकांकडून मिळवली आहे.
संजय लिला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटातील बाजीरावांच्या भूमिकेसाठी रणवीर सिंगनेही यापूर्वीच मराठीची शिकवणी सुरू केली होती. आधी संजय लिला भन्साळींच्या ‘राम-लिला’ चित्रपटात गुजराथी युवकाची हुबेहुब भूमिका साकारणाऱ्या रणवीरला ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटातील संवादफेक साधताना बरीच तारेवरची कसरत करावी लागली. भाषा आणि तिच्या उच्चाराबाबत दिग्दर्शकाला कोणतीही तडजोड करायची नसल्याने या चित्रपटातील सगळेच प्रमुख कलाकार मराठी भाषेवर मेहनत घेताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा