बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने कारकीर्दीच्या सुरूवातीच्या टप्प्यात तब्बल तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या तिच्या माजी व्यवस्थापकाच्या गौप्यस्फोटावर अखेर प्रियांकाने आपले मौन सोडले.
प्रकाश जाजू या आपल्या माजी व्यवस्थापकाचा दावा प्रियांकाने पूर्णपणे फेटाळून लावला. जो व्यक्ती सध्या तुरूंगात शिक्षा भोगत आहे, अशा व्यक्तीच्या वक्तव्यावर कोणतीही शाहनिशा न करता माध्यमं विश्वास कशी काय ठेवू शकतात? त्याने केलेल्या वक्तव्यात कोणतेही तथ्य नाही त्यामुळे मला ते अजिबात महत्त्वाचे वाटत नाही, असे प्रियांका म्हणाली.
केवळ सिनेजगतातील लोकांनी केलेल्या आत्महत्यांचीच चर्चा का होते? ज्या महिलांनी सासूच्या किंवा इतर कोणा व्यक्तीच्या जाचाला कंटाळून केलेल्या आत्महत्यांबाबत आपण का बोलत नाही? नेहमी सिनेजगताकडेच बोट का दाखविले जाते?, असे प्रश्न प्रियांकाने यावेळी उपस्थित केले. शो बाजीच्या जगतातून आपल्याला बाहेर यायला हवे. कोणालाही त्या २४ वर्षीय तरुणीच्या(प्रित्युषा) आत्महत्येचे खरे कारण माहित नाही. तिला नेमका कोणता त्रास होत होता हे देखील कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. पण तिच्या इतर गोष्टींबाबत वायफळ चर्चा केली जाते. तिच्या मृत्यूनंतर तिला आणि तिच्या कुटुंबियांना सध्या जो आदर दिला गेला पाहिजे, तो कोणीही देत नाही, हे अतिशय दु:खद असल्याचे प्रियांका म्हणाली.
‘त्या’ ट्विटवरून प्रियांका चोप्राच्या आईने मॅनेजरला खडसावले!
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रियांकाच्या माजी व्यवस्थापकाने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून प्रियाकांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाबाबतचे धक्कादायक ट्विटर करून खळबळ उडवून दिली होती. प्रियांका चोप्रा ही जरी आता खंबीर असली तरी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिला फार असुरक्षित वाटत होते. त्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण मी तिला वेळीच तसे करण्यापासून थांबवले. पीसी आणि तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर असीम यांच्यात बरेच वाद होत असत. याचा तिला बराच त्रास व्हायचा. याबाबत ती मला अगदी मध्यरात्रीही फोन करून सांगत असे, प्रकाश जाजूने आपल्या ट्विट्समध्ये म्हटले होते.