प्रियांका चोप्राने हॉलीवूडची वारी केली. तिथे सीरिज, चित्रपट मिळवून बॉलीवूडच्या या देसी गर्लने आपली करिअरची गाडी रुळावर आणली. तिथेच तिने आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला आणि लग्न केलं. तिचा जोडीदार म्हणजे निक जोनास (Nick Jonas). निक जोनास हा गायक आणि गीतकार आहे. त्याची ‘जोनास ब्रदर्स’ या बँडमधील गाणी लोकप्रिय आहेत. निकबरोबर त्याचे दोन भाऊ केविन जोनास आणि जो जोनास या बँडमध्ये आहेत. प्रियांकाची सोयरिक या लोकप्रिय अमेरिकन बँडच्या घरात जुळल्याने ती, तिचे दीर आणि त्यांच्या पत्नी यांच्या नेहमी चर्चा असतात. आता निकचा भाऊ आणि प्रियांकाचा दीर असणाऱ्या जो जोनासचा घटस्फोट झाल्याची बातमी आली असून चर्चांना उधाण आले आहे.

निक जोनास आणि प्रियांकाची वहिनी असलेल्या सोफी टर्नर(Sophie Turner) आणि जो जोनास(Joe Jonas) यांचा घटस्फोट झाला आहे. सोफी ही हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून ती याआधी ‘एक्समॅन’ चित्रपटात दिसली आहे. तर ती प्रसिद्ध अशा ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्येही मुख्य भूमिकेत होती. जो जोनास आणि सोफी टर्नर यांचा आता अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जो आणि सोफी वेगळे झाले आहेत.

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “मी मुख्यमंत्र्यांची विरोधक आहेच पण…”, बीड आणि परभणी प्रकरणी सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन
love became mistake chatura
आयुष्याची घडी विस्कटवणारी वादळवाट…
madhuri dixit husband dr shriram nene asked to pose solo at event
मिस्टर अँड मिसेस नेनेंचा डॅशिंग लूक! माधुरी दीक्षितसाठी पतीने केलं असं काही…; ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक
Bigg Boss Fame Marathi Actor Pushpa Style Dance
‘पुष्पा २’च्या ‘पीलिंग्स’ गाण्यावर मराठी अभिनेत्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Tarak Mehta Fame Mandar Chandwadkar Wife
‘तारक मेहता…’ फेम आत्माराम भिडेच्या पत्नीला पाहिलंत का? ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत साकारतेय भूमिका, म्हणाली…
Namrata sambherao
“खूपच अभिमान वाटतो”, अभिनेत्री नम्रता संभेरावने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ सहकलाकाराचे केले कौतुक

हेही वाचा…प्रियांका चोप्रा ‘स्त्री २’मधील ‘या’ गाण्याच्या प्रेमात; कलाकारांची स्तुती करीत म्हणाली, “तू एकदम छान, तो तर अगदी सोनं”

सोफी आणि जो यांनी २०१७ मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली आणि २०१७ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला. त्यांनी २०१९ मध्ये लास वेगासमध्ये लग्न केले. जोबरोबर राहण्यासाठी सोफी इंग्लंडमधून न्यूयॉर्क शहरात गेली होती, त्यांना दोन मुली आहेत.

चार वर्षांच्या संसारानंतर त्या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाबद्दलच्या अधिकृत निवेदनात असे लिहिले आहे की, “आम्ही दोघांनी लग्नाच्या चार वर्षांनंतर नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. मात्र, आम्ही एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे, आम्हाला मनापासून आशा आहे की तुम्ही आमच्या मुलींसाठी आमच्या गोपनियतेचा आदर कराल.

हेही वाचा…अमिताभ बच्चन भाऊ अजिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाले, “आम्ही खूप भांडायचो, एकमेकांना ब्लॅकमेल…

२०२४ च्या वर्षाच्या सुरुवातीला मार्च महिन्यात असे वृत्त आले होते की, दोघे त्यांच्या मुलींच्या ताब्यावरून भांडत होते. त्यामुळे घटस्फोटासाठी दोघांमध्येही तोडगा निघू शकला नव्हता. यानंतर सोफीने तिची घटस्फोटाची कार्यवाही पुन्हा सुरू करण्यास सांगितले होते. आता मात्र यावर तोडगा निघाला असून त्या दोघांनी मुलींना इंग्लंडमध्ये एकत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा…Video: मलायका अरोराचे सावत्र वडील अनंतात विलीन; अरबाज खानने दुसऱ्या पत्नीसह मलायकाच्या कुटुंबियांची घेतली भेट

जो आणि सोफी दोघेही त्यांच्या आयुष्यात आता बरेच पुढे गेले आहेत. जो लेबनीज अभिनेत्री लैला अब्दल्लाहबरोबर अनेकदा दिसला आहे, तर सोफी पेरी पीअरसनबरोबर अनेकदा दिसून आली आहे. दरम्यान, जो जोनासचे जोनास ब्रदर्स बँडबरोबर आगामी अनेक दौरे आहेत.

Story img Loader