बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यावर देसी गर्ल प्रियांका चोप्राने हॉलीवूडची वाट धरली. ग्लोबल स्टार झालेल्या प्रियांकाने २०१८ मध्ये निक जोनसशी लग्नगाठ बांधली. सध्या अभिनेत्री सासरच्या परिवारासह अमेरिकेत राहते. जोनस कुटुंबातून नुकतीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रियांकाचा पती निकच्या मोठा भावाला म्हणजेच केविन जोनसला कर्करोगाचं निदान झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या केविनवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्याला त्वचेचा कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. केविन जोनसने रुग्णालयातून एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या प्रकृतीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत त्याने त्वचेचा कर्करोग झाल्याने नुकतीच त्याची शस्त्रक्रिया झाल्याचं सांगितलं.

हेही वाचा : तुला शिकवीन चांगलाच धडा : अक्षरा-अधिपतीच्या नात्यात भुवनेश्वरी आणणार दुरावा, काय असेल तिचा नवीन कट? पाहा प्रोमो

बेसल सेल कार्सिनोमा म्हणजे काय?

केविनला झालेल्या त्वचेच्या कर्करोगाला बेसल सेल कार्सिनोमा म्हणतात. खरंतर हा आजार केविनच्या डोक्यावर आलेल्या चामखीळात आढळला. तपासणी केल्यावर हा त्वचेच्या कर्करोगाचा एक प्रकार असल्याचं सर्वांसमोर आलं. यानंतर केविनवर शस्त्रक्रिया करण्यात आली. बेसल सेल कार्सिनोमा हा त्वचेच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. हा आजार शरीरातील बेसल पेशींमध्ये वाढू लागतो. बेसल पेशी आपल्या त्वचेच्या थराच्या अगदी खाली असतात आणि या पेशी त्वचेमध्ये नवीन पेशी तयार करत राहतात. त्यामुळे या पेशी पारदर्शक स्वरूपात असतात.

आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्याने बेसल सेल कार्सिनोमा होतो. जे लोक सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांचा किंवा टॅनिंग बेडचा दीर्घकाळ वापर करतात त्यांना त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते. या आजारात अनेकदा कपाळ, नाक, खालचा ओठ, गाल, मान आणि कानांवर गुलाबी किंवा लाल चट्टे दिसतात.

हेही वाचा : Video: ‘खतरों के खिलाडी १४’ मध्ये शालिन भनोटला २०० हून अधिक विंचवांनी केला दंश! धक्कादायक व्हिडीओ आला समोर

हेही वाचा : “दामले निवृत्त व्हा”, प्रशांत दामलेंच्या पोस्टवर नेटकऱ्याचा खोचक सल्ला, अभिनेत्याने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

बेसल सेल कार्सिनोमावर उपचार होणं सहज शक्य आहे. आजाराचं निदान अगदी सुरुवातीला झालं असल्यास बायोप्सी करून सगळी लक्षणं काढून टाकता येतात. बेसल सेल कार्सिनोमा या आजारावर उपचार होणं भारतातही शक्य आहे. सरकारी रुग्णालयांव्यतिरिक्त, खाजगी रुग्णालयांमध्येही बेसल सेल कार्सिनोमासाठी शस्त्रक्रिया करण्याची तरतूद आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra brother in law kevin jonas diagnosed with skin cancer shares video sva 00