बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले. प्रियांकाने लग्न केल्यानंतर तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन निक जोनासचे आडनाव लावले होते. प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन जोनास हे तिचे सासरचे आडनाव अचानक वगळले आहे. यामुळे आता प्रियांका लवकरच घटस्फोट घेणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर आता प्रियांकानेच केलेल्या एका कमेंटने उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांकाने पती निकच्या एका पोस्टवर कमेंट केली आहे. निकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत निक वर्कआऊटकरताना दिसत आहे. घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना प्रियांकाने निकच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. प्रियांकाने निकने त्याच्या बॉडीवर फिदा होऊन कमेंट केली आहे. तिच्या या कमेंटने ती आणि निक विभक्त होत नसल्याचं कळतं आहे.

आणखी वाचा : आमिर ‘या’ अभिनेत्री सोबत करणार तिसरं लग्न?

आणखी वाचा : “सरकारची चापलूसी करणारेच…”, कंगनाच्या ‘भीक’ या वक्तव्यावर मुकेश खन्ना भडकले

प्रियांकाने २०१८ मध्ये निक जोनासशी लग्न केले. त्यांनी जयपूरमध्ये लग्न केले. तर त्याच वर्षी मे महिन्यात ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले होते. दरमम्यान, प्रियांकाला तिची एंगेजमेंट रिंग विकत घेता यावी म्हणून निकने टिफनी स्टोअर बंद केले होते. हॉलिवूड रिपोर्टच्या मते अंगठीची किंमत ही २ कोटी रुपयांच्या आसपास आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra comment on divorce with her husband nick jonas dcp