अभिनय, फॅशन, हटके लूकमुळे प्रियांका चोप्राचा चाहतावर्ग सातासमुद्रापलिकडे पोहोचला. सोशल मीडियावर तर तिचे लाखो चाहते आहेत. एखादा फोटो, व्हिडीओ तिने पोस्ट केला की काही मिनिटांमध्येच तिच्या पोस्टवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव होतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

प्रियांकाचा असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये डान्स करताना दिसतेय. काळ्या रंगाच्या बिकनी लूकमुळे प्रियांका या व्हिडीओमध्ये अधिक उठून दिसत आहे. प्रियांकाने हा व्हिडीओ पोस्ट करताच काही मिनिटांमध्येच नेटकऱ्यांनी याला पसंती दिली आहे.

प्रियांका नव्वदच्या दशकातील हिंदी गाणी ऐकत त्यावर थिरकताना दिसत आहे. आमिर खानच्या ‘दिल है की मानता नहीं’, ‘नीले नीले अंबर’ यांसारख्या रिमिक्स गाण्यांचा आनंद ती घेत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने म्हटलं आहे की, “अचानक जेव्हा काही तास तुम्हाला स्वतःसाठी मिळतात तेव्हा साऊंड ऑन होतो. आवाज ऐकून ही कोणती गाणी आहेत हे तुम्ही ओळखू शकता का?” प्रियांकाचा या व्हिडीओमधील स्टायलिस्ट लूक लक्ष वेधून घेणारा आहे.

आणखी वाचा – अपघाताच्या २६ दिवसांनंतर मलायकाचा ‘तो’ फोटो आला समोर, कपाळावर दिसली खूण

प्रियांका सध्या तिच्या संसारामध्ये चांगलीच रमली आहे. कुटुंबासोबत अधिकाधिक एकत्रित वेळ घालवणं तिने पसंत केलं आहे. ती परदेशात राहत असली तरी तिथे भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रत्येक सण प्रियांका साजरा करते. यामध्ये तिच्या सासरच्या मंडळींचा देखील समावेश असतो.

Story img Loader