बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय असते. तिच्या प्रत्येक पोस्टला लाखोंच्या संख्येने लाइक्स मिळतात. सोशल मीडियावर तिची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. स्वतः प्रियांका इन्स्टाग्रामवर जवळपास ६४२ जणांना फॉलो करते. यात जगभरात प्रसिद्ध असलेले अनेक बडे बॉलिवूड स्टार्स, गायक आणि मोठे सेलिब्रिटी आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ती बॉलिवूडच्या तीन मोठ्या सेलिब्रिटींना फॉलो सुद्धा करत नाही. सगळ्यात विशेष बाब म्हणजे तिने या स्टार्ससोबत चित्रपटांमध्ये काम सुद्धा केलंय.

प्रियांका चोप्रा तिच्या इन्स्टाग्रामवर बिग बी अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, कतरिना कैफ, सलमान खान, दीपिका पदुकोण सारख्या अनेक बड्या सेलिब्रिटींना फॉलो करते. पण बॉलिवूडचा ‘किंग’ अभिनेता शाहरुख खान, ‘सिंघम’ अभिनेता अजय देवगण आणि ‘खलनायक’ अभिनेता संजय दत्त सारख्या स्टार्सचे नाव या यादीत नाही. विशेष म्हणजे प्रियांकाने शाहरुख खानसोबत ‘डॉन’ चित्रपटात, अजय देवगणसोबत ‘ब्लॅकमेल’ आणि संजय दत्तसोबत ‘अग्निपथ’ चित्रपटात काम केलंय. अभिनेता शाहरूख खानसोबत प्रियांकाची तर जबरदस्त बॉण्डिंग झाली होती. या तीन सुपरस्टार्ससोबत चित्रपटांमध्ये एकत्र काम करूनही तिने यांना इन्स्टाग्रामवर फॉलो का केलं नाही याचं उत्तर ती स्वतःच देऊ शकते.

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अखेरला ती राजकुमार राव सोबत ‘द व्हाइट टायगर’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट OTT वर रिलीज झाला होता. तिच्या या चित्रपटाचं समीक्षकांनी देखील खूप कौतुक केलं होतं. याशिवाय प्रियांका लवकरच जोया अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ सारख्या रोड ट्रिप देखील आधारित आहे.

 

Story img Loader