बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने ब्रिटनमध्ये तिच्या ‘सिटाडेल’ चं शूटिंग पूर्ण केलं असून ती पुन्हा अमेरिकेत परतली आहे. प्रियांका सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहते. अमेरिकेत परतताच प्रियांकाला मात्र भारतीय पदार्थ खाण्याचा मोह आवरलेला दिसत नाही. प्रियांकाने भारतीय खाण्यावर मनसोक्त ताव मारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टास्टोरीला फोटो आणि व्हिडीओ शेअर केलाय. प्रियांकाने तिच्या न्यूयॉर्कमधील रेस्‍त्रांमध्ये भारतीय पदार्थांवर ताव मारत पेटपूजा केलीय. प्रियांकाने तिच्या सोना या न्यूयॉर्कमधील हॉटेलमध्ये या खाण्याची मजा लुटलीय. यात चटणी सांबरसोबत तिने डोस्याची चव चाखलीय. तर ब्रेड पकोड्यावर देखील ताव मारल्याचं पाहायला मिळतंय.

(Photo-Instagram@priyankachopra)

Video: “दिसणं, शरीरापेक्षा व्यक्ती म्हणून तुम्ही कोण हे महत्वाचं”- अक्षया नाईक

प्रियांका चोप्राने यावर्षी मार्च महिन्यात न्यूयॉर्कमध्ये हॉटेल सुरू केलंय. या हॉटेलला तिने पती निक जोनसच्या पसंतीस उतरलेलं ‘सोना’ हे नाव दिलंय. इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअऱ करत प्रियांकाने तिच्या या नव्या हॉटेलची माहिती दिली होती. तसचं या हॉटेलमध्ये उपलब्ध असलेल्या भारतीय पदार्थांबदद्लही सांगितलं होतं.

हे देखील वाचा: करीना कपूरचा ड्रेस पाहून भडकला होता सैफ अली खान, म्हणला “आधी ते कपडे…”

प्रियांकाच्या या रेस्‍त्रांमध्ये अनेक भारतीय पदार्थ उपलब्ध आहेत. यात भजी, उपमा, डोसा, पाणीपुरी, चिकन पकोडा, अशा अनेक पदार्थांचा समावेश आहे. त्याचसोबत चिकन कोळीवाडा, मालवणी कोळंबी करी, बटर चिकन आणि नान असे अनेक प्रसिद्ध भारतीय पदार्थ अमेरिकेतील लोकांना या रेस्टारंटमध्य़े उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra enjoying indian food in her new york restaurant sona eating dosa and pakoda kpw