एकता कपूरच्या ‘शूटआऊट अॅट वडाळा’ या चित्रपटातील ‘बबली बदमाश है’ या आयटम सॉंगबद्दल प्रियांक चोप्रा खूप उत्साही असल्याचं दिसत आहे.
मला एकता कपूरसोबत काम करायचेच होते आणि या गाण्यासाठी तिने माझ्याकडे आग्रह धरला होता. इतकी वर्षे मी मुद्दामपणेच बॉलीवूडमध्ये आयटम सॉंग न करण्याचा निर्णय घेतला होता, असं प्रियांका म्हणाली.
पण आम्हा दोघींनाही एकमेकींसोबत काम करायचे होते आणि त्यासाठी ही चांगली संधी होती. त्यामुळेच मी माझ्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ‘गुंडे’ चित्रपटासाठी कोलकाता येथे चित्रिकरणाच्या वेळी पत्रकारांशी बोलताना प्रियांका बोलत होती.
बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री करीना कपूर आणि कतरीना कैफ यांनी याआधी आयटम सॉंग केले असून प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच या शर्यतीत उतरत आहे.
प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच संजय गुप्ता दिग्दर्शित ‘शूटआऊट अॅट वडाळा’ या चित्रपटात ‘बबली बदमाश है’ या आयटम सॉंगवर नाचणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, अनिल कपूर, मनोज वाजपेयी, तुशार कपूर, सोनू सूद आणि कंगना राणावत यांसारखे बडे कलाकार काम करत आहेत.
‘शूटआऊट अॅट वडाळा’ १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
आयटम सॉंग ‘बबली बदमाश है’ बाबत प्रियांका चोप्रा उत्साही
एकता कपूरच्या 'शूटआऊट अॅट वडाळा' या चित्रपटातील 'बबली बदमाश है' या आयटम सॉंगबद्दल प्रियांक चोप्रा खूप उत्साही असल्याचं दिसत आहे. मला एकता कपूरसोबत काम करायचेच होते आणि या गाण्यासाठी तिने माझ्याकडे आग्रह धरला होता. इतकी वर्षे मी मुद्दामपणेच बॉलीवूडमध्ये आयटम सॉंग न करण्याचा निर्णय घेतला होता, असं प्रियांका म्हणाली.
First published on: 06-03-2013 at 03:57 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra excited about item song babli badmaash hai