मनोरंजनाच्या क्षेत्रात असलेली सततची दगदग आणि कामाच्या अनियमीत वेळा याचा परिणाम कलाकारांच्या आरोग्यावर होऊ लागल्याची उदाहरणे हल्ली वारंवार समोर येत आहेत. हा सततचा ताण प्रसंगी त्यांच्या जिवावर बेतत आहे. संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात काशीबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असताना बेशुध्द पडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार सेटवर आल्यापासूनच प्रियांकाची तब्येत बरोबर नव्हती. तरीही तिने शुटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अभिनय करण्यासाठी कॅमेऱ्यासमोर उभी राहाताच तिची तब्येत आणखीनच बिघडली आणि ती बेशुध्द होऊन खाली कोसळली. यामुळे सेटवर एकच खळबळ माजली. तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. खूप दिर्घ अशा या दृष्यासाठी प्रियांकाला अनेक टेक्स द्यावे लागले. आजारीपणामुळे खूप थकवा जाणवत असल्याने प्रियांका बेशुध्द होऊन खाली कोसळली. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील आपली भूमिका खूप आव्हानात्मक असून, त्यासाठी आपण खूप मेहनत घेत असल्याचे अलिकडेच प्रियांकाने टि्वट केले होते.
‘बाजीराव मस्तानी’च्या सेटवर प्रियांका झाली बेशुध्द
मनोरंजनाच्या क्षेत्रात असलेली सततची दगदग आणि कामाच्या अनियमीत वेळा याचा परिणाम कलाकारांच्या आरोग्यावर होऊ लागल्याची उदाहरणे...
First published on: 26-11-2014 at 07:57 IST
TOPICSप्रियांका चोप्राPriyanka ChopraबॉलिवूडBollywoodहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra faints on the sets of bajirao mastani