बॉलिवूडमधील काही आघाडीच्या अभिनेत्री त्यांच्या अभिनयाबरोबरच फॅशन सेन्ससाठीदेखील ओळखल्या जातात. त्यात प्रियांका चोप्राचे नाव प्रामुख्याने येते. आंतरराष्ट्रीय पातळीवर लीलया वावरणाऱ्या प्रियांकाचा ‘फॅशन सेन्स’देखील तितकाच वाखाणण्याजोगा आहे. अलीकडेच तिने आपल्या कुटुंबियांसमवेत मालदिवमध्ये वाढदिवस साजरा केला. त्यानंतर पुन्हा ती अमेरिकेला रवाना झाली. आपल्या फॅशन विषयी जागरुक असलेली प्रियांका आपले सुंदर फोटो इंन्स्टाग्रामवर पोस्ट करून तिच्या चाहत्यांना तिच्या विषयीची माहिती पुरवत असते. मालदिवमधील फोटोंमध्ये ती जणू एखाद्या ‘आयलंड क्विन’सारखी दिसत होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अलिकडच्या काळातील तिचे फोटो पाहिल्यास ती प्रामुख्याने ‘फ्लोरल प्रिंट’चे ड्रेस घालत असल्याचे पाहायला मिळते. एअरपोर्टपासून सर्वत्र ती ‘फ्लोरल प्रिंट’च्या ड्रेसमध्ये अनेकवेळा आढळून आली आहे. सध्या पावसाळा सुरू असून, सुंदर नैसर्गिक वातावरणाला साजेसे असे हे ‘फ्लोरल प्रिंट’चे ड्रेस अधिकच खुलून दिसतात. प्रियांकाने घातलेल्या अशाच काही ड्रेसवर एक नजर टाकू. या पावसाळी वातावरणात तरुणींनादेखील हवेहवेसे वाटावेत असेच हे ड्रेस आहेत.
पहिला लूक
फ्लोरल प्रिंटचा सुंदर सिल्क ड्रेस परिधान केलेल्या प्रियांकाचा एअरपोर्टवरील लूक.
दुसरा लूक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेताना प्रियांकाने हा फ्लोरल ड्रेस घातला होता. ज्यावरून समाजमाध्यमांवर खूप चर्चादेखील रंगली होती.
तिसरा लूक
रितु कुमारने डिझाइन केलेल्या या फ्लोरल मॅक्सीत प्रियांका कमालीची सुंदर दिसतेय. गडद रंगाच्या प्रिंटमुळे प्रियांकाचा लूक अधिकच खुलला आहे.
चौथा लूक
या शॉर्ट रफल्ड ड्रेसमध्ये ती खचितच सुंदर दिसते आहे. सुंदर ‘फ्लोरल प्रिंट’ आणि ‘बॅकलेस पॅटर्न’ या ड्रेसला एकाचवेळी कूल आणि सेक्सी बनवतो.
पाचवा लूक
पुन्हा एखादी फ्लोरल मॅक्सी, परंतु यावेळी त्यावर डेनिम जॅकेटदेखील परिधान केले आहे. या सिझनमधील प्रियांकाची अनोखी फॅशन तिच्या रुपाच्या प्रेमात पाडणारी अशीच आहे.