‘गर्ल राइजिंग’ या अनुबोधपटातील कथांपैकी एका कथेला आपला आवाज देणारी अभिनेत्री फ्रिडा पिंटो म्हणाली, करिअरमध्ये मिळालेल्या प्रोत्साहनाने तिला या उपक्रमाचा हिस्सा बनण्यासाठी प्रेरित केले. जगातील विविध भागातील नऊ मुलींची कथा सांगणा-या या अनुबोधपटाचे दिग्दर्शन ऍकॅडमी पुरस्कारासाठी नामांकन झालेले दिग्दर्शक रिचर्ड ई रॉबिन्स करत आहेत. यात घरातल्या लोकांच्या मर्जीविरूद्ध झालेला विवाह, लहान मुलीची कथा आणि यौन पिडासारख्या समस्यांचा सामना करणा-या मुलींच्या कथांचा समावेश करण्यात आला आहे. या मुलींनी सर्व अडचणींवर मात करत शिक्षण घेऊन त्यांच्या जीवनात बदलाव आणला आहे. फ्रीडा पिंटो व्यतिरिक्त हॉलिवूडमधील मेरिल स्ट्रीप, एनी हॅथवे, लियाम नीसन, केट ब्लैंचेट, सेलेना गोमेज आणि बॉलिवूडमधील प्रियांका चोप्राने या चित्रपटात आपला आवाज दिला आहे.

Story img Loader