बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. नुकतंच प्रियांकाचा ४० वा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या निमित्ताने एक छान पार्टीचे आयोजनही करण्यात आलं होतं. यावेळी तिच्या अनेक मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली. या पार्टीत प्रियांका आणि निकच्या लेकीची झलक पाहायला मिळाली.

प्रियांका चोप्राच्या एका फॅन क्लबने इन्स्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत प्रियांका ही तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत छान वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत तिची एक मैत्रीण फोटो काढत आहे. या फोटोत तिच्यासोबत तिची लाडकी लेकही पाहायला मिळत आहे.

Photos : देसी गर्लच्या वाढदिवसाचे रोमँटिक सेलिब्रेशन, प्रियांकाला किस करत निकने दिल्या शुभेच्छा

यावेळी प्रियांकाने आणि तिच्या लेकीने एकाच रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यावेळी प्रियांका ही फार छान दिसत होती. विशेष म्हणजे प्रियांकाच्या मागे वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही डेकोरेशनही पाहायला मिळत आहे. पण इतर फोटोंप्रमाणे या फोटोतही तिने तिच्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे तिचे चाहते निराश झाले आहेत.

सहा महिन्याच्या लेकीला घेऊन प्रियांका चोप्रा निघाली पिकनिकसाठी, म्हणाली “आता आमच्या मुलांसोबत…”

प्रियांकाने हा फोटो शेअर करताना तिच्या बाळाच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजी लावला आहे. ज्यामुळे तिचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. दरम्यान प्रियांका ही लवकरच रुसो ब्रदर्सच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. यासोबतच प्रियांका बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याही भूमिका असणार आहेत.

Story img Loader