हॉलीवूड अभिनेता जॉन ट्रॅव्होल्टा १५व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (आयफा) उपस्थित होते. यावेळी ते बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेता हृतिक रोशनसोबत आयफा पुरस्कार सोहळ्यात थिरकले.
प्रियांकाने नृत्य करत असताना ट्रॅव्होल्टा यांना स्टेजवर खेचले. ६० वर्षीय या अभिनेत्याने प्रियांकासोबत ‘तुने मारी इन्ट्रिया’ या गाण्यावर १९९४सालातील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पल्प फिक्शन’ यातील काही सिग्नेचर मूव्हज केल्या. “तालीम न घेता कोणीही तुमच्यासारख सुंदर नृत्य करू शकत नाही,” असे प्रियांका जॉन यांना म्हणाली. आंतरराष्ट्रीय चित्रपटातील जॉन यांच्या उल्लेखनीय योगदानाकरिता त्यांना हृतिकच्या हस्ते गौरविण्यात आले. हृतिकने यावेळी आपण या ग्रीस कलाकाराचे चाहते असल्याचे कबूल केले. त्यानंतर या दोघांनी ‘स्टेइंग अलाव्ह’ या प्रसिद्ध नृत्य मंचावर सादर केले.
हृतिक हा अत्यंत हुशार आहे. मला येथे गौरविल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, असे जॉन म्हणाले.

Story img Loader