अभिनेत्री प्रियांका चोप्रा व निक जोनस हे लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं आहे. २०१८ साली ते विवाहबद्ध झाले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच ते त्यांच्या कामामुळेही नेहमीच चर्चेत असतात. अशातच आता निक जोनसचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निक जोनस हा जगभरातील लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. त्याच्या गाण्यांना चाहते अक्षरशः डोक्यावर घेतात. त्याच्या कॉन्सर्टलाही प्रचंड गर्दी होते. पण नुकत्याच एका कॉन्सर्टमध्ये तो स्टेजवर पडला.

आणखी वाचा : “मी ते ऐकलं आणि…,” भारतात ‘जिजू’ म्हटलं जाण्याबाबत अखेर निक जोनसने दिली प्रतिक्रिया

जोनस ब्रदर्सच्या सध्या संपूर्ण कुटुंबासोबत वर्ल्ड टूरवर आहेत. या दरम्यान झालेल्या एका कॉन्सर्टचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये निक दंग होऊन गाणं गात आहे. गाणं गात गात तो स्टेजच्या समोरच्या भागाकडे आला. पण मागे जाताना त्याचा पाय अडखळला आणि तो पडला. पडल्यावर मात्र तो लगेच उठून उभा राहिला आणि त्याने पुन्हा गायला सुरुवात केली.

हेही वाचा : काय सांगता! प्रियांका चोप्राच्या लेकीच्या हातात महागडी पर्स, किंमत वाचून व्हाल थक्क

त्याचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला असून यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. सर्वजण त्याच्या या जिद्दीचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra husband fell on stage while performing live in concert video gets viral rnv