बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने तीच्या आगामी ‘क्रिश ३’ चित्रपटाची नायिका तीच असल्याचे जोर देत म्हटले आहे. ‘क्रिश ३’ चित्रपटामध्ये प्रियांका चोप्रा सोबत कंगना राणावत हिची देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
कंगना राणावत हिने सुरूवातीला या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला होता. प्रियांका सोबत कामकरण्यास ती तयार नव्हती. कंगनाच्या आधी जॅकलिन फर्नांडिस व चित्रांगदा सिंह यांनी देखील ‘क्रिश ३’ चित्रपटामध्ये प्रियांका सोबत काम करण्यास नकार दिला होता.
“बऱ्याच अभिनेत्र्यांनी ही भूमिका नाकारली होती. मात्र, तो त्यांचा मुर्खपणा होता कारण ही भूमिका अतिशय जबरजस्त आहे. या चित्रपटाची नाय़िका मीच आहे. या चित्रपटामध्ये मी हृतिक याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे,” असे प्रियांका म्हणाली.       
कंगना राणावतची भूमिका देखील महत्त्वाची असल्याचे प्रियांका कबूल करते. प्रियांकाला संधी मिळाली असती तर तीने देखील कंगनाची भूमिका आवडीने साकारली असती असे सांगितले.  
“कंगना ने साकारलेली भूमिका महत्त्वपूर्ण आणि अद्भूत आहे. त्या भूमिकेमध्ये खरेपणा आहे. मला संधी मिळाली असती तर मी नक्कीच ती भूमिका साकारली असती. मी राकेश रोशन यांना या भूमीकेसाठी तयार असल्याचे कळवले होते, ” असे प्रियांका चोप्रा पुढे म्हणाली.
कंगना ने ही भूमिका साकारली याचा मला आनंद आहे. तीने या भूमिकेला पूरेपूर न्याय दिला आहे. हिंदी चित्रपटामध्ये ही अत्यंत नवखी भूमिका असल्याचे प्रियांकाने सांगितले.      
‘क्रिश ३’ येत्या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शीत होणार आहे.