बॉलीवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राला सगळ्यात जास्त भीती वाटते ती अपयशाची. आपला एखादा चित्रपट तिकीट बारीवर अपयशी ठरला तर कमीतकमी दोन आठवडे आपण खोलीतून बाहेर पडत नसल्याचे तिने सांगितले.
प्रियंका म्हणाली की, मला अपयशाची खूप भीती वाटते. मात्र यामुळे मी पुढेही जाते. जर माझा कोणता चित्रपट अपयशी ठरला तर मला खूप वाईट वाटतं. मी विचार करते की आपल्या इतक्या मेहनतीनंतरही चित्रपट कसा अपयशी झाला. मी दोन आठवडे खोलीतून बाहेरच पडत नाही. जे चित्रपट मी केले आहेत, त्यामुळे मी खूश आहे आणि `सात खून माफ`, `व्हाट इज य़ूअर राशी` सारखे काही परंपरागत चित्रपट अपयशी झाले. मात्र ‘बर्फी’ हा चित्रपट हिट ठरला. हा चित्रपट करत असताना मला अनेकांनी म्हटलं, हा पुरुषप्रधान चित्रपट आहे तू नको करू. पण मला वाटत होतं की हा चित्रपट करावा आणि त्यानंतर मिळालेल्या यशाने मी खूशही आहे.” आयफा पुरस्कार सोहळ्यातील अभिनयावरील परिसंवादात प्रियांका असे म्हणाली. यावेळी प्रियांका सोबत स्टेजवर हॉलिवूड अभिनेता केविन स्पेसी होते.
प्रियांका चोप्राला अपयशाची भीती!
बॉलीवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राला सगळ्यात जास्त भीती वाटते ती अपयशाची.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-04-2014 at 11:41 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra i have a huge fear of failure