संजय लीला भन्साळीच्या आगामी ‘मेरी कोम’ चित्रपटात प्रियांका चोप्रा मेरीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मेरीच्या लग्नाची दृश्ये चित्रीत करण्यात आली असून, त्यात मेरीने तिच्या लग्नात घातलेल्या पोशाखासारखा हुबेहुब पोशाख प्रियांकाने चित्रपटात परिधान केलायं. याकरिता मेरीच्या लग्नातील पोशाख मागविण्यात आला होता आणि त्यानंतर तसाच दुसरा पोशाख डिझायनर रजतने प्रियांकासाठी बनवला.
यावर दिग्दर्शक ओमंग म्हणाला की, आमच्या या चित्रपटात जे सत्यात घडले आहे तेच दाखविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. लग्नाच्या दृश्याचे चित्रीकरण आम्हाला हुबेहुब मेरीच्या लग्नाप्रमाणेच करायचे होते. जो पोशाख मेरीने तिच्या लग्नात घातला होता तसाच पोशाख या दृश्यातही हवा होता. मी डिझायनर रजतला सांगितले जे मटेरियल मेरीच्या पोशाखात वापरण्यात आले तेच या पोशाखातही वापरले जावे. इतकेच नाही तर हातातील पुष्पगुच्छही सारखाच घेण्यात आला आहे.

Story img Loader