‘क्वांटिको’ या अमेरिकन टेलिव्हिजनवरील मालिकेसाठी मानाचा ‘पीपल्स चॉईस अॅवॉर्ड’ पुरस्कार पटकवल्यानंतर आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका मोठ्या हॉलीवूड प्रोजक्टमध्ये काम करण्याच्या तयारीत आहे. प्रियांका सध्या  ड्वेन जॉन्सन आणि झॅक इफ्रॉन यांच्याबरोबर ‘बेवॉच’ या चित्रपटात काम करण्यासंदर्भात बोलणी करत असल्याचे वृत्त आहे. नव्वदीच्या दशकात टेलिव्हिजनवर आलेली ‘बेवॉच’ ही मालिका अमेरिकेसह जगभरात चांगलीच गाजली होती. दिग्दर्शक सेठ गॉर्डन या मालिकेवर आधारित चित्रपट तयार करत असून थोड्याच दिवसांत ‘बेवॉच’च्या चित्रीकरणाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. प्रियांका सध्या ‘क्वांटिको’ मालिकेत व्यस्त असल्याने ‘बेवॉच’साठीच्या तारखांचा मेळ घालण्यासाठी संबंधितांशी बोलणी करत आहे.
अमेरिकेतील ‘क्वांटिको’ टीव्ही मालिकेतील एफबीआय एजंटच्या भूमिकेसाठी ‘पीपल्स चॉईस अॅवॉर्ड’ पुरस्कार पटकावणारी प्रियांका ही पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली आहे. प्रियांकाने इमा रॉबर्ट्स, जॅमी ली कर्टिस, ली मिशेल आणि मार्सिया गे हार्डेन यांसारख्या मातब्बर अभिनेत्रींना मागे टाकत या पुरस्कारावर आपले नाव कोरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा