हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांची पसंती मिळलेली देशी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या ‘सिटाडेल’ या तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या शूटिंगवेळी प्रियांकाला दुखापती झाली आहे. प्रियांकाने फोटो शेअर करत ही माहिती चाहत्यांनी दिली. हे फोटो पाहून अनेक चाहते हैराण झाले आहेत.
प्रियांका चोप्राने शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर इन्स्टास्टोरीला दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकाच्या कपाळावर जखमा झाल्या असून तिचं कपाळ रक्ताने माखलेलं दिसतंय. पहिला फोटो शेअर करत “काय खरं आणि काय खोटं” असं कॅप्शन तिने दिलंय. तर दुसऱ्या फोटोत प्रियांकाने भुवयांमध्ये झालेली जखम खरी असल्याचं म्हंटलंय. तर कपाळावरी जखम ही खोटी असल्याचं सांगितलंय.
हे देखील वाचा: अभिनेत्री किश्वर मर्चंटने दिली आनंदाची बातमी; बाळासोबतचा पहिला क्यूट फोटो केला शेअर
प्रियांका चोप्रा या वर्षाच्या सुरुवातीपासूनच लंडनमध्ये ‘सिटाडेल’ या सिनेमाचं शूटिंग करतेय. या सिनेमात प्रियांका एका गुप्तहेराची भूमिका साकारतेय. या सिनेमात ती रिचर्ड मॅडन आणि पेड्रो लिएंड्रोसोबत झळकणार आहे. या सिनेमापूर्वीच प्रियांकाने ‘टेक्स्ट फॉर यू’ सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
‘सिटाडेल’, ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि ‘मैट्रिक्स 4’ या हॉलिवूड सिनेमांसोबतच प्रियांका ‘जी ले जरा’ या बॉलिवूड सिनेमात आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत झळकणार आहे. नुकतिच या सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. फरहान अख्तर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.