बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा कामावर परतली आहे. मागील आठवड्यात प्रियांकाच्या वडिलांचे कर्क रोगामुळे निधन झाले होते, त्यामुळे प्रियांकाने चित्रिकरणाच्या सर्व तारखा रद्द केल्या होत्या. परंतु, आता संजय लिला भन्साली यांच्या ऑलिम्पीक ब्राँझपदक विजेती मुष्ठीयोध्दी मेरी कोम वरील जीवनपटाच्या चित्रिकरणाला प्रियांकाने सुरूवात केली आहे.
सोमवारी या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले असून, ओमुंग कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. प्रियांकाने या चित्रपटाच्या सेटवरून चित्रिकरणाचे छायाचित्र इस्टाग्रामवर प्रसिध्द केले आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रियांकाने आधीपासून तयारी सुरू केली होती. मेरी कोमची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर हुबेहुब वठविण्यासाठी प्रियांकाने खूप मेहनत घेतली आहे. मेरी कोमचा मणिपूर ते मुष्ठीयुध्दात पाचवेळा जगज्जेती होण्याचा प्रवास या चित्रपटात उलगडण्यात येणार आहे. मेरी कोमला गेल्या वर्षी पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले आहे. या आधी प्रियांकाने ‘बर्फी’, ‘अग्निपथ’ आणि ‘कमिने’ चित्रपटांमधून आपल्या अभिनयातील वैविध्य दाखवून दिले आहे.

Story img Loader