‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत माझ्या वेळी ‘स्वीमसूट’ फेरी नव्हती त्यामुळे माझे नशीब की, मला ‘बिकनी’ घालून स्टेजवर चालायला लागले नाही, असे मत २००० सालची ‘मिस वर्ल्ड’ बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने केले आहे.
‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेच्या आयोजकांनी स्पर्धेतून ‘स्वीमसूट’ फेरी बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना प्रियांका म्हणाली की, “हो, मोठ्या हिल्स आणि स्वीमसूट घालून स्टेजवर चालणे नक्कीच मनाला बुचकळ्यात टाकणारे आहे. ‘स्विमींग पूल’ किंवा समुद्रकिनारी ‘बिकनी’वर चित्रीकरण करणे सोयीस्कर वाटते कारण, त्यास नैसर्गिक आधार आहे. पण, स्टेजवर बिकनीत चालणे विचित्र वाटते.”
‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत स्टेजवर ‘बिकनी’त चालावे लागणे हे मला स्वत:ला विचित्र वाटते. माझ्यावेळी अशी ‘स्वीमसूट’ फेरी नव्हती त्यामुळे याचा मला आनंद आहे, असेही ती पुढे म्हणाली.    

Story img Loader