बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्रियांकाने अमेरिकने गायक निक जोनसशी लग्न केले आहे. त्या दोघांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. मात्र, निक प्रियांकाचा जीव कोणत्या कारणासाठी घेऊ शकतो याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांकाने दुबईत बुल्गारी या ब्रॅंडच्या नवीन कलेक्शनच्या लॉन्चमध्ये हजेरी लावली होती. यावेळी ‘व्होग’ला प्रियांकाने मुलाखत दिली होती. यावेळी तिला प्रश्न विचारण्यात आला की ‘तिला आतापर्यंत भेटवस्तू म्हणून असा कोणता दागिना आहे, जो तिला प्रचंड आवडतो?’ सुरुवातीला विनोद करत प्रियांका म्हणाली, “जर मी माझ्या एंगेजमेंटची रिंग म्हटलं नाही तर माझा नवरा निक जोनस मला मारून टाकेल. गंमत, करते”

आणखी वाचा : “आपण हिंदू की मुस्लीम?” आर्यन, सुहानाच्या प्रश्नावर शाहरुखने दिले होते ‘हे’ उत्तर

आणखी वाचा : क्रांती रेडकर राहत असलेल आलिशान घर आतुन पाहिलत का?

पुढे प्रियांका म्हणाली, “मला माझी एंगेजमेंट रिंग म्हणायचे आहे कारण, ती अनपेक्षित होती. एवढंच नाही तर जे दागिने मी घालते त्याविषयी मी नेहमी विचार करते. मात्र, माझ्या एंगेजमेंट रिंगशी अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. याच कारणामुळे मी म्हणेन की माझी एंगेजमेंट रिंग माझा आवडता दागिना आहे.”

आणखी वाचा : आयकर विभागाने धाड टाकली तेव्हा प्रियंकाच्या घरात टॉवेल गुंडाळून फिरत होता ‘हा’ अभिनेता

प्रियांकाने २०१८ मध्ये निक जोनासशी लग्न केले. प्रियांकाला तिची एंगेजमेंट रिंग विकत घेता यावी म्हणून निकने टिफनी स्टोअर बंद केले होते. हॉलिवूड रिपोर्टच्या मते अंगठीची किंमत ही २ कोटी रुपयांच्या आसपास आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra jokingly says if she do not say her engagement ring is most beautiful jewelry than nick will kill her dcp