प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे मनोरंजनसृष्टीतील सर्वात लोकप्रिय लोकप्रिय जोडपे आहे. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ दररोज व्हायरल होताना दिसतात. शेअर होणाऱ्या त्यांच्या फोटो आणि व्हिडीओजमध्ये त्यांचे एकमेकांवरील असलेले प्रेम हे नेहमीच दिसून येते. अलीकडे असे काही घडले की ते पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : सुपरस्टार अल्लू अर्जुनची लेक मोठ्या पडद्यावर पाऊल टाकण्यासाठी सज्ज, ‘या’ चित्रपटातून करणार पदार्पण

शनिवारी न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये ‘ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल’मध्ये प्रियांका चोप्रा सूत्रसंचालक होती. तिथे प्रियांकाने निकवर असलेल्या प्रेम पुन्हा दर्शवले. पण यावेळी प्रियांकाने केलेल्या कृतीने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. नुकत्याच झालेल्या ‘ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल’ कार्यक्रमात प्रियांका चोप्राचा पती निक जोनस आणि जोनस ब्रदर्स यांचे सादरीकरण होते. त्यांच्यासोबत गायिका मारिया कॅरीनेही लाईव्ह परफॉर्म केले. या कार्यक्रमात प्रियांका चोप्रासोबत स्टेजवर अभिनेत्री केटी होम्स आणि इतरही अनेक जण सहभागी झाले होते.

हेही वाचा : सोशल मीडियावरून जोनस आडनाव काढून टाकल्यानंतर प्रियांकाने केली पहिली पोस्ट, नेटकरी म्हणाले ‘असं का केलं’

जो जोनासने प्रियांकाची ‘ग्लोबल सिटीझन फेसटिवहलची’ अॅम्बेसेडर म्हणून ओळख करून दिली. त्यानंतर निकनेही प्रियंकाचा अभिमान वाटत असल्याचे सांगत तिला स्टेजवर बोलावले. प्रियांका स्टेजवर येताच जो जोनस आणि निकला भेटली. निकने तिच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावनांना प्रत्युत्तर म्हणून प्रियांकाने स्टेजवरच निकला किस केले. प्रियांकाने केलेल्या या कृतीने सर्वजण आश्चर्याचकित झाले. यानंतर निक प्रियांकाला माईक देऊन निघून गेला. प्रियांकाने नंतर तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर त्या क्षणाचा एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडीओ बघून सर्व चाहते कमेंट्स करत त्या दोघांबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra kissed nick johns on stage in houseful show rnv