भारतीयांकडून इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून, या वर्षासाठीच्या घातक ऑनलाईन सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेत्री प्रियांका चोप्राने सर्वात वरचे स्थान पटकावल्याचे एका सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे. या यादीत तिच्या खालोखाल बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान आणि सलमान खान यांनी स्थान मिळवले आहे.
मागच्या वर्षी या यादीत पहिल्या स्थानावर असलेल्या पॉर्नपरी सनी लिओनीला प्रियांका चोप्राने मागे टाकले आहे.
इंटरनेट आणि संगणकासाठी सुरक्षेचे सॉफ्टवेअर बनवणा-या मेकॅफीद्वारे करण्यात आलेल्या या सर्वेक्षण यादीत, यावेळी सनी लिओनी नवव्या स्थानावर आहे. आवडत्या सेलिब्रिटीची माहिती मिळविण्याचे चाहत्यांमध्ये आकर्षण असते, यासाठी ते इंटरनेटचा वापर करतात. अशा सेलिब्रिटींचा सायबर गुन्हेगार कशाप्रकारे वापर करतात हे दर्शविणा-या या सर्वेक्षणात करीना कपूर आणि अक्षय कुमार पहिल्या पाच जणांमध्ये आहेत.
मेकॅफीचे भारतातील केंद्राचे तंत्रज्ञान विभागाचे उपाध्यक्ष (ग्राहक आणि मोबाईल व्यवसाय विभाग) वेंकटसुब्रमण्यम क्रिश्णापुर म्हणाले, भारतात सेलिब्रिटींना देवाचा दर्जा दिला जातो. इंटरनेटवरील आपली वेबसाईट पाहण्यासाठी लोक आकर्षित व्हावेत म्हणून सायबर गुन्हेगार अशा सेलिब्रिटींच्या नावाचा वापर करतात. या वेबसाईटवरील छुप्या व्हायसरमुळे इंटरनेट वापरकर्त्याची वैयक्तिक माहिती या गुन्हेगारांपर्यंत पोहचवली जाते. त्याचप्रमाणे या व्हायरसमुळे संगणक आणि मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे देखील नुकसान होते.
या वर्षी नेटकरांनी इंटरनेटवरील सर्च इंजिनमध्ये सेलिब्रिटींचे वॉल पेपर, व्हिडिओ आणि नग्न छायाचित्रांच्या वेबसाईट शोधल्या असता मिळालेल्या पर्यायांनी त्यांना छुपा व्हायरस असलेल्या वेबसाईटवर नेल्याचे प्रमाण मोठे आहे. यात प्रियांका चोप्राच्या नावावर ७९ व्हायरस बाधीत निकाल असून, दुस-या स्थानावर असलेल्या शाहरूख खानच्या नावावर ७५ तर तिस-या स्थानावर असलेल्या सलमान खानच्या नावावर ६८ व्हायरसने बाधीत वेबसाईट आहेत.
याशिवाय टॉप टेनमध्ये सैफ अली खान, महानायक अमिताभ बच्चन, फरान अख्तर, सनी लिओनी आणि हृतिक रोशन यांची नावे देखील आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा