बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले आहे. त्यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. मात्र, निकची पत्नी म्हणून प्रियांकाची ओळख करून दिल्यावर प्रियांका संतापली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रियांकाने एक बातमी शेअर केली आहे. या बातमीत प्रियांकाला तिच्या नावाने न बोलता निक जोनसची पत्नी असा उल्लेख केला आहे. ही बातमी शेअर करत “आश्चर्याची गोष्ट आहे की मी जगातला सगळ्यात आयकॉनिक फ्रेंचायझीचे प्रमोशन करत आहे आणि आज ही लोक माझ्या विषयी बोलताना कोणाची तरी पत्नी असा उल्लेख करत आहेत,” असे कॅप्शन प्रियांकाने दिले आहे.
आणखी वाचा : अभिनेत्रीचा ब्रालेस व्हिडीओ पाहून भडकली तिची आई म्हणाली…
पुढे आणखी एक फोटो शेअर करत प्रियांका म्हणाली, “कृपया मला सांगा, आज ही स्त्रीयांसोबत अस का होतं? मी माझ्या IDMB ची लिंक माझ्या बायोमध्ये अॅड केली पाहिजे का? या पोस्टमध्ये प्रियांकाने पती निक जोनसला ही टॅग केले आहे.
आणखी वाचा : लग्नानंतर अंकिताला पती विकीने भेट म्हणून दिलं ५० कोटींच ‘हे’ गिफ्ट
दरम्यान, प्रियांका सध्या ‘The Matrix: Resurrections’ या तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. तिचे प्रमोशनमधले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम बायोमधून पती निक जोनसचं आडनाव काढून टाकलं होतं. त्यानंतर ते दोघं विभक्त होणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. पण प्रियांकाची आई मधूने लगेच ही अफवा असल्याचे सांगितले होते.