बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू पसरवणारी ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत येत असते. कधी पती निक जोनाससोबत शेअर केलेल्या पोस्टमुळे तर कधी महत्त्वाच्या मुद्द्यावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत येत असते. अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतंच तिच्या ग्लॅमरस अंदाजातील काही फोटोज शेअर केले आहेत. बॉलिवूडच्या देसी गर्लचा हॉट लूक पाहून फक्त फॅन्स नव्हे तर सेलिब्रिटी सुद्धा फिदा झाले आहेत.
प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटोज शेअर केले आहेत. प्रियांचा चोप्राची कोणतीही पोस्ट असू देत, ती व्हायरल होतच असते. तिने हे फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या काही मिनीटांत दीड लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत आणि आता हे आकडे वाढतच चालले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा कडक उन्हात बिकनीमध्ये असलेली दिसून येतेय. देसी गर्लचा हा स्टायलिश अंदाज नेहमीप्रमाणेच तिच्या फॅन्सना भरपूर आवडलाय.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामच्या रिच लिस्टमध्ये सामिल
प्रियांका चोप्राची तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बरीच फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास 65 मिलियन इतके फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्राम रिच लिस्ट 2021 मध्ये प्रियांकाने २७ वे स्थान मिळवलंय. तिच्या या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक प्रमोशनल पोस्टसाठी जवळपास 403,000 डॉलर म्हणजेच ३ कोटी इतके चार्ज घेत असते.
प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती ‘सिटाडेल’ या तिच्या आगामी सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अखेरला ती ‘द व्हाइट टायगर’ आणि ‘द स्काइ इज पिंक’ सारख्या चित्रपटातून समोर आली होती. चित्रपटांच्या व्यतिरिक्त प्रियांकाचं स्वतःच एक प्रोडक्शन हाउस आहे. ‘पर्पल पेबल्स पिक्चर्स’ असं या प्रोडक्शन हाउसचं नाव आहे. या प्रोडक्शन हाउस मधून ‘व्हेंटिलेटर’, ‘सर्वन’, ‘पाहुणा’, ‘फायरबॅंड’, ‘पानी’, ‘द स्काय इज पिंक’, ‘द व्हाइट टायगर’ सारखे चित्रपट प्रोड्यूस केले आहेत.