प्रियांका चोप्रा आज जागतिक स्तरावरची लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट्स देत असते. सध्या प्रियांका चोप्राच्या नावाची सर्वत्र चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे अलीकडेच प्रियांका चोप्राने डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या वुमन लीडरशिप फोरम कॉन्फरन्समध्ये अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्याशी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. हा अनुभव प्रियांकाने चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : “२ ऑक्टोबरला तिकिटे बुक करा आणि…”, ‘दृश्यम २’च्या निर्मात्यांची प्रेक्षकांसाठी खास ऑफर

प्रियांका चोप्राने वॉशिंगटन येथे कमला हॅरिस यांची मुलाखत घेतली. यावेळी प्रियांकाच्या बोलण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रियांका चोप्राने स्वतःला आणि कमला हॅरिस यांना ‘भारताच्या कन्या’ असे संबोधून त्यांच्यातील साम्य अधोरेखित केलं. त्यासोबतच प्रियांका आणि कमला हॅरिस यांनी स्त्री साक्षरता आणि स्रिया विविध क्षेत्रात मिळवत असलेल्या यशाबद्दल चर्चा केली.

प्रियांकाने पोस्ट शेअर करत म्हटले, “पूर्वी लोकांनी स्त्रिशक्तीला कमी लेखले. स्त्रियांचे बोलणे मनावर घेतले जायचे नाही, तसेच त्यांना गप्प केले जायचे. पण आज आपण सगळ्या स्त्रिया एकत्र येऊ शकतो, जे चुकीचं आहे त्याला सुधारू शकतो.” पुढे मतदानाच्या अधिकाराबद्दलही प्रियांका व्यक्त झाली. तिने लिहिले, “मी अमेरिकेत मतदान करू शकत नाही. पण माझा नवरा करू शकतो आणि एक दिवस माझी मुलगीही करेल.” यासोबत प्रियांकाचे आणि कमला हॅरिस यांचे स्त्रियांबद्दलच्या विविध महत्वाच्या मुद्द्यांवर संभाषण झाले. आजच्या घडीला स्त्रिया विविध क्षेत्रात करत असलेलं कार्य हे निश्चितच अभिमानास्पद असल्याचं त्या दोघी म्हणाल्या.

हेही वाचा : …आणि प्रियांका चोप्राने भर कार्यक्रमात सेटजवरच निक जोनसला केलं किस, व्हिडीओ तुफान व्हायरल

प्रियंका चोप्राने ही मुलाखत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. या मुलाखतीबद्दल वाचून चाहत्यांच्या मनात तिच्याबद्दल आणखीनच अभिमान निर्माण झाला आहे. या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत नेटकरी प्रियांकाचे कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra met kamla harris and talked about women empowerment rnv