बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली. सरोगसीच्या मदतीने आई झाल्यानंतर प्रियांका ही सध्या मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. नुकतंक प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी आजी झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी बाळाच्या नावाबद्दलही खुलासा केला आहे.

गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियावर प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या बाळाची चर्चा पाहायला मिळत आहे. प्रियांकाची आई डॉ. मधू चोप्रा या आता आजी झाल्या आहेत. नुकतंच मधू चोप्रा यांच्या कॉस्मेटिक क्लिनिकला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल प्रसारमाध्यमांशी संवाद साधतेवेळी त्यांनी त्यांच्या नातीबद्दल भाष्य केले. यावेळी त्या म्हणाल्या, “आजी झाल्यानंतर मला खूप आनंद झाला आहे. मी या गोष्टीचा विचार करुन नेहमी हसत असते. मी फार आनंदी आहे.”

video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
bhagare guruji son Akhilesh bhagare will get marriage anagha atul share video
भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लेकीने लग्नघराचा व्हिडीओ केला शेअर
Neelam Rane on Nitesh Rane
Neelam Rane : “आई म्हणून मला भीती वाटते…”, नितेश राणेंबाबत नीलम राणेंना वाटते ‘ही’ काळजी!
Ruhi Chaturvedi announces pregnancy
Video: एकाच मालिकेतील तिसऱ्या अभिनेत्रीने दिली गुड न्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई

यावेळी प्रियांकाच्या आईला बाळाचे नाव काय ठेवले? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मधू चोप्रा म्हणाल्या, अजून प्रियांका आणि निकच्या बाळाचे नाव ठेवलेले नाही. जेव्हा पंडित त्याच्या नावाचे अक्षर देतील, त्यानंतर नाव ठरवण्यात येईल.

प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई झाल्याची माहिती दिली. तिने सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे. “आम्ही सरोगसीच्याद्वारे बाळाचं स्वागत केलं आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे क्षण आमच्यासाठी अतिशय खास आहेत आणि आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.’

आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ पाहिल्यानंतर समांथा म्हणाली, “हा चित्रपट…”

पण या पोस्टमध्ये तिनं मुलगा की मुलगी हे स्पष्ट केलेलं नाही. त्यानंतर प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने तिला मुलगी झाल्याची माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी प्रियांका पहिल्यांदा एका मॅगझिनच्या कव्हर फोटोवर झळकली होती.