बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता नवीन अवतारात दिसणार आहे. प्रियांकाला तिच्या पठडीतल्या लूकचा कंटाळा आला असून, व्यक्तिमत्वात नाविन्य आणण्यासाठी तिने नवा अवतार धारण केला आहे. आपले काळे लांब केस खांद्यापर्यंत कापून त्यांचा रंगदेखील बदलला आहे. लूकमध्ये बदल घडतानाचा क्षण छायाचित्राद्वारे तिने टि्वटर आणि फेसबुक या सोशल मीडियावर पोस्ट केला. सोशल मीडियावरील संदेशात ती म्हणते की काही तरी वेगळे करण्याची वेळ आली आहे. केस छोटे केल्याने थोडे रोमांचित झाल्यासारखे वाटते आहे. आपल्या नवीन लूकचा फोटो प्रियांकाने फेसबुकवर पोस्ट केला आहे. प्रियांकाच्या आधी सोनाक्षी सिन्हा आणि अनुष्का शर्मानेदेखील आपले केस छोटे केले होते.

priyanka450

Story img Loader