बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे काही महिन्यांपूर्वी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले. त्यांनी सोशल मीडियावर याबाबतची गुडन्यूज चाहत्यांना दिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बाळाची चर्चा सर्वत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. सरोगसीच्या मदतीने आई झाल्यानंतर प्रियांकावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. प्रियांका चोप्राच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच प्रियांकाने तिच्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने एक खास पोस्टही शेअर केली आहे.

प्रियांकाने मदर्स डे निमित्ताने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या लेकीचा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियांकाने तिच्या लेकीला छातीशी कवटाळलं असल्याचे दिसत आहे. तर निक हा त्याच्या लेकीकडे फार प्रेमाने पाहत आहे. या फोटोत तिच्या लेकीचा चेहरा मात्र दिसत नाही. या फोटोला कॅप्शन देताना प्रियांकाने आई झाल्याची भावना चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आले कारण

प्रियांका चोप्राची खास पोस्ट

“मदर्स डेच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की, गेले काही दिवस आमच्यासाठी रोलर कोस्टर राईडसारखे होते. याचा अनुभव अनेक लोकांनी घेतला असेल, याची आम्हाला कल्पना आहे. NICU मध्ये १०० हून अधिक दिवस राहिल्यानंतर अखेर आज आमचं बाळ घरी आलं आहे.

प्रत्येक कुटुंबासाठी हा प्रवास अनोखा असतो आणि त्यासाठी एका विशिष्ट स्तरावरील विश्वासाची आवश्यकता असते. आमच्या आयुष्यातील गेले काही महिने फार आव्हानात्मक होते. आम्ही आता मागे वळून पाहिलं तर प्रत्येक क्षण किती मौल्यवान आणि परिपूर्ण आहे, याची जाणीव मला होते. आमची चिमुकली घरी आल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही लॉस एंजेलिसमधील रेडी चिल्ड्रन्स ला जोला अँड सेडर्स सिनाई मधील प्रत्येक डॉक्टर, नर्स आणि तज्ज्ञांचे आभार मानतो. त्यांनी फार निस्वार्थपणे हे काम केले. यानंतर आता आमचा पुढचा प्रवास आता सुरु होत आहे. आमचं बाळ खरोखरच फार लढाऊवृत्तीचं आहे. चला MM पुढे जाऊया. आई आणि बाबांचे तुझ्यावर खूप प्रेम आहे.

माझ्या आयुष्यातील सर्व मातांना आणि काळजी घेणाऱ्या सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा. तुम्ही माझ्यासाठी हे सर्व सोपे केले आहेत. तसेच निक जोनस मला आई बनवल्याबद्दल तुझे धन्यवाद. मी तुझ्यावर प्रेम करतो”, असे प्रियांका चोप्रा म्हणाली.

निक जोनसने लग्नात मंगळसूत्र घातल्यावर कसं वाटलं? प्रियांका चोप्रा म्हणाली “माझ्यासाठी तो…”

दरम्यान प्रियांका आणि निकच्या मुलीचं नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ असे ठेवण्यात आल्याचे बोललं जात आहे. नुकतंच तिने तिच्या पोस्टमध्ये याला दुजोरा दिला आहे. प्रियांकानं आपल्या मुलीचं नाव ठेवताना दोन्ही संस्कृतींचा विचार केल्याचं बोललं जात आहे. मालती हे नाव संस्कृतमधून घेण्यात आलं आहे. ज्याचा अर्थ आहे ‘लहान सुगंधित फुल’ तर मेरी हे नाव लॅटिन भाषेतील स्टेला मॅरीसमधून घेण्यात आलं आहे. ज्याचा अर्थ समुद्राचा तारा असा आहे.

Story img Loader