ग्लोबल स्टार म्हणून नावारुपाला आलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच विदेशी सून होणार आहे. येत्या ३० नोव्हेंबर रोजी ती अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न करणार आहे. डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य देणाऱ्या या जोडीच्या लग्नाची तयारी सुरु झाली असून लग्नाच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थानमधील जोधपूर येथील उमेद भवन पॅलेस येथे या जोडीचा शाही विवाहसोहळा रंगणार असून लग्नातील प्रत्येक क्षण खास करण्याकडे या जोडीचा कल आहे. त्यामुळेच लग्नातील या दोघांची एण्ट्रीदेखील हटके स्वरुपात होणार आहे. लग्नाच्या ठिकाणी हे दोघं हेलीकॉप्टरने येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच उमेद भवन येथे हेलिपॅड तयार करण्यात येत आहे.

दरम्यान, २०० पाहुण्यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा संपन्न होणार असून यात बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये सेलिब्रेटींना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे या सेलिब्रेटींना विमानतळापासून विवाहस्थळापर्यंत पोहचण्यासाठी चॉपरचीदेखील सोय करण्यात आली आहे.

सध्या निक आणि प्रियांकाच्या घरातल्यांनी लग्नाची तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे निक नुकताच भारतात आला आहे. निक भारतात आल्यानंतर प्रियांकाने इन्स्टावर एक पोस्ट करत ‘Welcome home baby…’असं म्हणत त्याचं स्वागत केलं आहे. त्यानंतर प्रियांकाच्या संपूर्ण कुटूंबासोबत निकने डिनरला जात ‘Thanksgiving’ पार्टी सेलिब्रेट केल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra nick jonas wedding priyanka nick will be landing directlyat jodhpur as they made a helipad
Show comments