‘आईस बकेट चॅलेंज’साठी अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नाव तिच्या ओळखीच्यांकडून सुचविण्यात आले असले, तरी तिला यात रस नसल्याचे जाणवते. सध्या सर्वत्र ‘आईस बकेट चॅलेंज’ची धूम सुरू आहे. जगातील अनेक नामवंत मंडळी ‘आईस बकेटचे चॅलेंज’ स्वीकारताना दिसत आहेत. यात बॉलिवूडदेखील मागे नाही. मेंदू आणि मज्जातंतूच्या ‘एमियोट्रॉफिक लेट्रल स्केलेरॉसिस’ (एएलएस)नावाच्या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी बर्फाने भरलेले थंडगार पाणी आंगावर घेणे असे या चॅलेंजचे स्वरूप आहे. टॉम क्रुस, रॉबर्ट पॅटिनसन आणि निकोल किडमनसारख्या हॉलिवूड कलाकारांनी या चॅलेंजचा स्वीकार केला असून, बॉलिवूडमधील अक्षय कुमार, बिपाशा बासू आणि अभिषेक बच्चन यांनीदेखील बर्फाने भरलेली गार पाण्याची बादली आपल्या अंगावर ओतून घेतली. परंतु, अभिनेत्री प्रियांका चोप्रा यात सामील होणार नसल्याचे समजते. प्रियांकाने टि्वटरवरील संदेशात, तिचे नाव सुचविल्याबद्दल धन्यवाद मानले असून, आईस बकेट चॅलेंज थांबवावे याबाबतची ऑस्ट्रेलियन बातमीदाराच्या व्हिडिओची लिंकदेखील शेअर केली आहे. Newsreader Beautifully Shuts Down Ice Bucket Challenge pedestrian.tv/news/arts-and-culture/newsreader-beautifully-shuts-down-ice-bucket-chall/600a2c06-7dec-4f27-a74a-1ab99a534c75.htm तिने शेअर केलेल्या या लिंकमधील व्हिडिओत ऑस्टेलियन बातमीदार लिंकन हम्पराईज ही कल्पना बंद करावी, असा संदेश देताना दिसतो. ‘आईस बकेट चॅलेंज’द्वारा झालेल्या चांगल्या कामगिरीचा उल्लेख करत यापेक्षा अनोख्या पद्धतीने बदल घडवता येणे शक्य असल्याचे तो सुचवतो. एवढ्या मोठ्याप्रमाणावर बर्फ वाया घालविण्यापेक्षा कॅन्सरग्रस्तांसाठी प्रेमाचा संदेश पसरविण्याचा अथवा स्वच्छ पाण्यासाठी दानधर्म करण्याचा सल्ला देताना तो या व्हिडिओत दिसतो.
याआधी ‘फुक्रे’ चित्रपटातील अभिनेता पुलकीत सम्राटने सोनम कपूरचे नाव जेव्हा या चॅलेंजसाठी सुचवले होते, तेव्हा सोनमनेदेखील यास नकार दिला होता. पाण्यासारख्या महत्वाच्या नैसर्गिक संपत्तीचा अपव्यय न होण्याची इच्छा तिने टि्वटरवर प्रकट केली होती. हॉलिवूड अभिनेत्री पामेला अॅंडरसननेदेखील उपचारादाखल प्रयोगांसाठी प्राण्यांचा वापर करणाऱ्या संस्थेला मदत करण्यास नकार देत हे चॅलेंज स्वीकारण्याचे टाळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा