बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले आहे. तर त्याच्यासोबत न्युयॉर्कमध्ये स्थित झाली आहे. पण तरीही प्रियांका भारताला विसरली नाही. ती बऱ्याच मुलाखतीत तिच्या आईलविषयी आणि भारताविषयी बोलताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांका मंदिर आणि लोणच्याविषयी बोलली आहे.
प्रियांका सध्या तिचा आगामी चित्रपट ‘The Matrix: Resurrections’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच प्रियांकाने राशा गोयलला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रियांका म्हणाली, “तुम्ही मला भारतातून बाहेर काढू शकता, पण तुम्ही भारताला माझ्यातून बाहेर काढू शकत नाही. माझी संस्कृती किंवा मी ज्या प्रकारे राहते ते नेहमी माझ्यासोबत राहणार आहे. त्यामुळे मला कधीच वाटत नाही की मी घरापासून दूर आहे. माझे घर नेहमी माझ्यासोबत असते, माझे मंदिर नेहमी माझ्यासोबत असते, माझी आई नेहमी माझ्यासोबत असते, माझे लोणचे नेहमी माझ्यासोबत असते. त्यामुळे मला काही वाटतं नाही.”
आणखी वाचा : फोटो काढण्यासाठी आलेल्या पोलिसाला हटकल्यानंतर ; अक्षयने केलेल्या कृत्याचे होतयं कौतुक
आणखी वाचा : सुशांत सिंह राजपुतच्या बहिणीचा बोल्ड फोटो पाहिल्यानंतर नेटकरी संतप्त म्हणाले…
ती पुढे म्हणाली, “मला असेही वाटते की याचा संपूर्ण विचार केला आहे आणि मला नेहमीच दोन्ही इंडस्ट्रींमध्ये संतुलन आणायचे आहे. कारण जगभरात असे खूप कमी कलाकार आहेत जे ते करू शकले आहेत.” ‘The Matrix Resurrections’ हा या फ्रँचायझीचा ४ भाग आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.