देसी गर्ल प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडपासून दुरावली असली. तरी प्रियांका कायमच भारतीयांची मनं जिकताना दिसते. तसचं भारतपासून दूर राहत असली तरी ती आपल्या देशाशी आणि देशावासियांशी कायमच जोडलेली राहण्याचा प्रयत्न करताना दिसते. नुकतेच प्रियांकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंना भारतातील तिच्या लाखो चाहत्यांनी पसंती देत तिचं कौतुक केलंय.
प्रियांका चोप्राचे प्रायव्हेट जेटमधील काही फोटो व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोत तिने एक ब्लेझर आणि खाकी रंगाची पॅन्ट परिधान केल्याचं दिसतंय. तर या प्रायव्हेट जेटमध्ये प्रियांका बिनधास्त पायांची मांडी घालून बसली आहे. प्रियांका तिच्या ‘सिटाडेल’ या आगामी सीरिजसाठी इतर काही कलाकारांसोबत या जेटने स्पेनला जात असतानाचा हा फोटो आहे. प्रियांका चोप्राच्या फॅन पेजवर प्रियांकाचा हा फोटो शेअर करण्यात आलाय.
“तुझे गाल माकडासारखे…”; व्हायरल फोटोंमुळे दिव्या खोसला कुमार ट्रोल
या फोटोवरून प्रियांकाने आपला देसी अंदाज कायम ठेवल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्या फोटोला पसंती दिलीय. कुणी ‘देसी गर्ल’ तर कुणी ‘इंडिया वाली’ म्हणत प्रियांकाचं कौतुक केलंय.
दरम्यान, प्रियांका चोप्रा ‘सिटाडेल’ या स्पाय थ्रिरल सीरिजमध्ये झळकणार आहे. त्याचसोबत बॅरी लेविनसनच्या ‘शीला’ या आध्यात्मिक सिनेमाक आनंद शीला यांती भूमिका साकारणार आहे. तर फरहान खान दिग्दर्शित ‘जिले जरा’ या सिनेमात ती कतरिना कैफ आणि आलियासोबत झळकणार आहे.