प्रियांका चोप्रा ही अभिनयाबरोबरच निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे. लवकरच प्रियांका चोप्राच्या ‘पर्पल पेबल प्रोडक्शन’चा ‘पाहुना’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियांका पहिल्यांदाच सिक्कीम भाषेतील चित्रपटाची निर्मिती करत आहेत. याआधी या प्रोडक्शन अंतर्गत मराठी, गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मीती करण्यात आली होती.
‘पाहुना: द लिटिल व्हिजिटर’ असं या चित्रपटाचं नाव असून ७ डिसेंबरला तो प्रदर्शित होणार आहे. पालकांपासून दुरावलेल्या तीन लहान मुलांची कथा ही ‘पाहुना’मध्ये पाहायला मिळणार आहे. नेपाळमधल्या माओवाद्यांच्या कचाट्यातून सिक्कीमला आपल्या पालाकांसमवेत पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन मुलांची ही कथा असणार आहे.
The wait is finally over… Pahuna – The little visitors releases in theatres across India on 7th Dec 2018. This is a very special film and I can't wait to share it with you all. #Pahuna7thDec pic.twitter.com/es0r2QxDFH
— PRIYANKA (@priyankachopra) November 5, 2018
जर्मनीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले. पाखी टायरवालानं या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे असं म्हणत प्रियांकानं ट्विटरवर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.