अली अब्बास जफरच्या ‘गुंडे’ चित्रपटात प्रियांका, रणवीर मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात प्रणयरम्य दृश्ये करताना दिसणारी ही जोडी झोया अख्तरच्या चित्रपटात भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. रणवीर-प्रियांका हे दोघेही अभिनयात निपुण आहेत. तसेच, या भूमिकेत ते खूप चांगले दिसतील, अशी रणवीरशी जवळीक असलेल्या सूत्रांनी माहिती दिली आहे.
या भूमिकेसाठी झोयाला रणबीर आणि करिनाला घ्यायचे होते. हे दोघेजण ख-या जीवनातही चुलत भावंडे असल्यामुळे चांगली भूमिका करु शकतील असे तिला वाटत होते. परंतु, काही कारणास्तव रणबीर-करिनाने नकार दिल्याने त्यांच्याऐवजी प्रियांका-रणवीरला भूमिकेसाठी विचारणा करण्यात आल्याची माहिती आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Oct 2013 रोजी प्रकाशित
प्रियांका-रणवीर दिसणार भाऊ-बहिणीच्या भूमिकेत?
अली अब्बास जफरच्या 'गुंडे' चित्रपटात प्रियांका, रणवीर मुख्य भूमिका साकारत आहेत.

First published on: 07-10-2013 at 12:42 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra ranveer singh to play siblings in zoya akhtars film