प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याला मुलगी झाली असल्याची गोड बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली. सरोगसीच्या मदतीने प्रियांका-निक आई-बाबा झाले. प्रियांकाने नुकतंच मदर्स डेच्या निमित्ताने आपल्या मुलीसोबतचा पहिला फोटो शेअर केला. फोटो शेअर करत असताना तिने मुलीसाठी खास पोस्ट देखील लिहिली. यामध्ये आपली मुलगी १०० दिवसांनी रुग्णालयातून घरी आली असल्याचं तिने सांगितलं. पण मुलगी घरी येताच प्रियांका मात्र तिच्या कामामध्ये व्यस्त झाली आहे.

प्रियांका हॉलिवूड सीरिज सिटाडेलमध्ये (Priyanka Starts shooting of Citadel) झळकणार आहे. या सीरिजच्या चित्रीकरणाला तिने सुरुवात केली आहे. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सेटवरचा फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. प्रियांकाचा सेटवरील फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये प्रियांका ज्या खुर्चीवर बसली आहे त्या खुर्चीवर तिचं नाव लिहिलेलं दिसत आहे. तसेच तिने लाल रंगाचा डिप नेक ड्रेस परिधान केला असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – कतरिनाने पतीसोबत शेअर केला स्विमिंग पूलमधील सर्वात हॉट फोटो, दिसला रोमँटिक अंदाज

प्रियांका रुग्णालयातून लेक घरी येताच कामावर परतली असल्याने आश्चर्य देखील व्यक्त होत आहे. प्रियांका आणि निकने त्यांच्या मुलीचं पहिल्यांदाच घरी आल्याने जोरदार स्वागत केलं. प्रियांकाने मदर्स डेच्या निमित्ताने शेअर केलेल्या फोटोमध्ये निक आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी स्पष्टपणे दिसून येत होता. तसेच मुलगी रुग्णालयात असताना आमची काय परिस्थिती होती हे देखील प्रियांकाने तिच्या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं.

प्रियांका हॉलिवूडबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही काम करताना दिसणार आहे. ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये प्रियांका मुख्य भूमिका साकारणार आहे. आलिया भट्ट, कतरिना कैफ देखील या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. प्रेक्षक देखील प्रियांकाला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत.

Story img Loader