बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्राचे फक्त परदेशात नव्हे तर भारतातही चाहते आहेत. प्रियांका चोप्रा नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. लग्नानंतर प्रियांका चोप्रा पती निक जोनससह अमेरिकेत स्थायिक झाली. मात्र आता तब्बल तीन वर्षांनी प्रियांका चोप्रा भारतात परतली आहे. प्रियांका चोप्रा भारतात परतल्यानंतर तिचा विमानतळावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने तीन वर्षांनंतर भारतात परतत असल्याचं म्हटलं होत. मध्यरात्री प्रियांका भारतात परतली. ती भारतात परतणार असल्याचे कळताच अनेक पापाराझींनी विमानतळावर तिचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी गर्दी केली होती.
आणखी वाचा : करोनानंतर तीन वर्षांनी प्रियांका चोप्रा भारतात परतणार, भावूक होत म्हणाली…
प्रसिद्ध फोटोग्राफर विरेंद्र चावला यांनी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत प्रियांका चोप्रा ही एअरपोर्ट लाँजमधून बाहेर येताना दिसत आहे. यावेळी तिने निळ्या रंगाचा डेनिम टॉप आणि हाय वेस्ट पँट परिधान केली आहे. त्याबरोबर तिने पांढऱ्या रंगाचे शूजही घातले आहेत. प्रियांकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक पाहायला मिळत आहे. यावेळी ती सर्व पापाराझींना पाहून फार आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ती त्यांना पाहून धन्यवाद, धन्यवाद असे बोलताना दिसत आहे.
यानंतर ती एका गाडीत बसून घरी जाताना दिसत आहे. ती गाडीत बसल्यावरही अनेक पापाराझी त्याचे फोटो शेअर केले आहे. या व्हिडीओवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहे. अनेकांनी यावर हार्ट इमोजी शेअर केले आहे. तिच्या चाहत्यांना ती भारतात परतल्याचा फारच आनंद होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “विकी कौशलविषयी बोललो की तू…” सलमान खानने कतरिना कैफसमोर केली उघडपणे कमेंट
दरम्यान प्रियांका ही लवकरच रुसो ब्रदर्सच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. यासोबतच प्रियांका बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याही भूमिका असणार आहेत.