बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका आणि निक जोनस यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. जानेवारी महिन्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली होती. प्रियांका ही आता आई झाली असली तरी तिला लहान मुलं फार आवडतात. ती नेहमी त्यांच्या जवळ असते. फार वर्षांपूर्वी प्रियांकाला एक निरागस बाळाचा लळा लागला होता. मात्र प्रियांकाची आई मधू चोप्रा यांच्या नकारामुळे तिला त्या मुलीला कुटुंबासोबत ठेवता आले नाही.

प्रियांका चोप्राने स्वत: या घटनेचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, “एकेदिवशी रात्री मी आमच्या घरात झोपली होती. त्यावेळी घरात माझ्या आईची आणि आजीची एका गंभीर विषयावर चर्चा सुरु होती. त्यावेळी माझा भाऊ सिद्धार्थचा नुकतंच जन्म झाला होता. माझी आजी आमच्याकडे राहायला आली होती. त्यावेळी माझी आई किचनमध्ये एका नवजात बाळाला घेऊन उभे असल्याचे मी पाहिले.”

“बॉलिवूडमधील कपूर कुटुंबाप्रमाणेच…”, दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवींनी व्यक्त केली ‘ती’ इच्छा

यानंतर मी आईला त्या बाळाविषयी विचारले. तर तिने मला घडलेली सर्व घटना सांगितली. त्यावेळी तिची आई म्हणाली, “मी रुग्णालयात एका महिलेची डिलिव्हरी करुन घरी परतण्यासाठी गाडीमध्ये बसली होती. तेव्हा मी एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. मी तो आवाज ऐकून बाळ नक्की कुठे रडतंय याचा शोध घेत होती. त्यावेळी कोणीतरी एका नवजात बाळाला भर पावसात गाडीखाली सोडून गेले होते”, असे ती म्हणाली.

“माझ्या आईने त्या मुलीला घरी आणून माझ्या भावाचे कपडे घातले होते. आईने हे सर्व सांगितल्यानंतर त्या नवजात मुलीला आपल्या घरी ठेवून घेण्यासाठी मी प्रचंड आग्रही होती. मी तिला याबाबत सांगितले. पण तिने यासाठी स्पष्ट नकार दिला आणि तेव्हा ती मला म्हणाली की आपण असे करु शकत नाही. त्यापेक्षा आपण मुलंबाळ नसलेल्या एका जोडप्याला ती मुलगी देऊ, असे तिने मला सांगितले. यानंतर ती मला घेऊन त्या जोडप्याला ते बाळ देण्यासाठी गेली”, असेही तिने म्हटले.

“त्यावेळी एखादे बाळ दत्तक घेण्यासाठी कायदेशीर अटी-शर्थींची पूर्तता करावी लागते, याची मला कल्पनाही नव्हती. मी फक्त तेव्हा त्या मुलीला भेटल्यानंतर तिला प्रेमाने घट्ट मिठी मारावी, इतकेच वाटत होती. पण त्यावेळी ते बाळ दत्तक घेताना त्या जोडप्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मी आजतागायत विसरु शकत नाही. ते दोघेही फार रडत होते”, असेही ती भावूक होत म्हणाली.

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ चित्रपटावर प्रियांका चोप्राची प्रतिक्रिया, म्हणाली…

प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई झाल्याची माहिती दिली. तिने सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे. “आम्ही सरोगसीच्याद्वारे एका बाळाचे स्वागत केले आहे” असे प्रियांकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रियांका पहिल्यांदा एका मॅगझिनच्या कव्हर फोटोवर झळकली होती.

Story img Loader