बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्रा ही नेहमी तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. प्रियांका ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. प्रियांका आणि निक अनेकदा त्यांचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अवघ्या काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली. मात्र लग्न झाल्यानंतर प्रियांकाने निकसाठी अनेक रात्र जागून काढल्या आहेत. एका मुलाखतीदरम्यान तिने याबाबत खुलासा केला होता.

प्रियांका आणि निक हे दोघे अनेकदा त्यांचे फोटो पोस्ट करत असता. त्यांचे हे फोटो पाहून त्यांचे एकमेकांवरील प्रेम दिसून येते. विशेष अनेक कार्यक्रमातही ते दोघेही एकत्र हजेरी लावतात. प्रियांका आणि निकने प्रेमविवाह केला असून त्यांच्यातील प्रेम कसूभरही कमी झालेले नाही. पण निकसोबत लग्न झाल्यानंतर प्रियांकाने त्याच्यासाठी अनेक रात्र जागून काढल्या आहेत. लग्नानंतर प्रियांकाला अनेक तास जागी राहायची, एका मुलाखतीत प्रियांकाने याचा खुलासा केला होता.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…

प्रियांकाने या मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, “लग्नानंतर मला अनेक तास झोपच यायची नाही. कारण निक जोनसला मधुमेहाचा त्रास आहे. त्याला मधुमेहाचा हा त्रास फार वर्षांपासून आहे. त्यामुळे त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या कारणामुळे निक अनेकदा त्याची शुगर चेक करण्यासाठी रात्री उठतो.”

“निक फार संवेदनशील आहे. त्याची शुगर ठिक आहे का? ती वाढली की कमी झाली? हे पाहण्यासाठी निकला रात्री वारंवार उठावे लागते. दरम्यान लग्नानंतर मी निकची शुगर चेक करायचे. त्यामुळे मला अनेक रात्री जागून काढाव्या लागल्या,” असे प्रियांका म्हणाली.

महेश मांजरेकर यांची लेक सईनं अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली…

प्रियांका तिची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. दरम्यान निकनेही एकदा मुलाखतीत तिेचे फार कौतुक केले होते. माझ्या आयुष्यात अनेक मुली आल्या आणि गेल्या. पण मला प्रियांकासारखी मुलगी मिळणे खूप अवघड आहे, असे त्याने एकदा मुलाखतीत म्हटले होते.

Story img Loader